मारुती नवले आणखी पाच दिवस कारागृहात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

पुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी सिंहगड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती नवले यांना न्यायालयाने सात दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार दोन दिवस उलटले असून, आणखी पाच दिवस त्यांना कारागृहात राहावे लागणार आहे. 

दरम्यान, नवले यांच्याविरुद्ध आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती (ईबीसी) थकविल्या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली. मात्र चतुःशृंगी पोलिसांनी ही तक्रार सिंहगड पोलिसांकडे वर्ग केली आहे. सिंहगड शिक्षण संस्थेतील दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची ईबीसी शिष्यवृत्ती थकविल्या प्रकरणी सिंहगड समन्वय समिती व संभाजी ब्रिगेड यांनी नवरात्री उत्सवाच्या काळात चतुःशृंगी पोलिसांकडे तक्रार दिली होती. शुक्रवारी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चतुःशृंगी पोलिसांकडे विचारणा केली. त्या वेळी पोलिसांनी संबंधित प्रकार हा सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, सिंहगड पोलिसांनी मात्र आपल्याकडे अद्याप तक्रार आली नसल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले. 

Web Title: Sinhgad Institute President Maruti Navale for five more days in jail