सिंहगड रस्ता बनतोय ‘स्पोर्टस्‌ हब’

आनंदनगर - येथील खेळाच्या मैदानात मुलांना क्रिकेटसह इतर मैदानी खेळ खेळता येतात.
आनंदनगर - येथील खेळाच्या मैदानात मुलांना क्रिकेटसह इतर मैदानी खेळ खेळता येतात.

सिंहगड रस्ता - सिंहगड रस्ता आता ‘स्पोर्टस हब’ बनू पाहतोय. सुमारे दोन-तीन वर्षांपूर्वी या भागातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदाने, क्रीडांगणे शोधावी लागत होती. आता मात्र खेळण्यासाठी विविध मैदाने, उद्याने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत हरवलेला परिसर म्हणून या रस्त्याची ओळख पुसून मैदानांनी परिपूर्ण परिसर अशी ओळख निर्माण होत आहे.

गेल्या दोन, तीन वर्षांपूर्वी सिंहगड रस्ता परिसरातील मुलांना खेळण्यासाठी छोटी मैदानच काय तर जागादेखील उपलब्ध नव्हती. त्या वेळी मुलांना नवसह्याद्री, कोथरूड, कर्वेनगर, अथवा नेहरू स्टेडियम या भागात जावे लागत होते. पण, आता फुटबॉल, क्रिकेट, धनुर्विद्या (आर्चरी), जलतरण आदी खेळ खेळण्यासाठी मैदाने तसेच तत्सम साधने या भागात उपलब्ध झाली आहेत. 
शिवाय मैदाने घराजवळ असल्याने नागरिकांचा वेळही वाचतो आणि जा-ये करण्यात होणारे श्रमदेखील कमी होतात. यातून मुलांच्या खेळण्याचा, आरोग्याचा प्रश्‍न काही प्रमाणात सोडविण्यात आला आहे. पण याबरोबरच इतरही खेळांचे पर्यायदेखील मुलांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

ही मैदाने होणार
    विठ्ठलवाडी हिंगणे येथे होणार क्रीडा संकुल. 
    सनसिटी रस्ता परिसरात बॅडमिंटन हॉल होत आहे. 
    माणिकबाग येथे मुलांना खेळण्यासाठी नवीन बाग साकारली जात आहे.

सोसायट्यांमध्ये जागा नसल्याने खेळता येत नाही. फुटबॉलच्या मैदानामुळे चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आमच्या करिअरला नवे वळण मिळाले आहे. भरपूर सराव करता येतो आणि त्यासाठी खूप दूरदेखील जावे लागत नाही. 
- दिव्यज देशपांडे, विद्यार्थी, गणेश कॉम्प्लेक्‍स, माणिकबाग

सिंहगड रस्ता परिसरातील मुलांना खेळण्यासाठी इतरत्र जावे लगत होते. त्यामुळे वेळ वाया जात होता. तसेच ओढाताण होत होती. आता मात्र या परिसरात विविध मैदाने उपलब्ध झाल्याने आमची अडचण दूर झाली आहे. 
- राधिका गुजर, आशिष अर्पाटमेंट, आनंदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com