सिंहगडच्या सैरने भाचेमंडळींचा आनंद द्विगुणित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

‘मामाच्या गावाला जाऊया’ उपक्रमांतर्गत पुणे भेट
पुणे - सिंहगडाचा दरवाजा, बुरूज, पाण्याची विहीर, टकमक टोक, शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी, त्यांच्या शौर्याचा इतिहास सांगणारा किल्ला पाहून भाचे मंडळींच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. पहिल्यांदाच किल्ला पाहताना या निरागस मुलांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

निमित्त होते, अंघोळीची गोळी संस्थेतर्फे ‘मामाच्या गावाला जाऊया’ या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील शेतकरी व अनाथ मुलांना घडविलेल्या पुणे भेटीचे! यावेळी संयोजक माधव पाटील, शरद बोदगे, अमोल बोरसे उपस्थित होते. या मुलांनी सिंहगड किल्ला, चतुःशृंगी देवी मंदिर, सावित्रीबाई फुले
पुणे विद्यापीठ, बालवाडीतील क्रीडासंकुल, गन फॉर ग्लोरी अकादमी, क्रिकेटचे भव्य म्युझियम ब्लेड्‌स ऑफ ग्लोरी, शनिवारवाडा, फर्ग्युसन कॉलेज, पत्रकारिता विभाग आदी ठिकाणांना भेटी देऊन पुणे शहराची ओळख करून घेतली.

शिरूर येथील एका कंपनीला भेट देऊन उद्योग क्षेत्राची ओळख करून घेतानाच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत पुढे कसे जायचे हे या मुलांनी जाणून घेतले. उद्योजक राम कुतवळ यांनी मुलांशी संवाद साधला. त्यानंतर मुलांनी आइस्क्रीम खाण्याचा आनंद लुटला. चित्रपट अभ्यासक समर नखाते यांनी या मुलांशी गप्पा मारत विविध संधीविषयी सांगितले.

डॉ. अमित पाचेगावकर यांच्या पुढाकारातून या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली. पुण्यातील विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने या मुलांच्या राहण्याची मोफत सोय लजपतराय विद्यार्थी भवन येथे करण्यात आली होती.

Web Title: sinhgad tour mamachya gavala jau ya