बहिणीचे किडनीदान, वाचले भावाचे प्राण

बाबा तारे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे (औंध) : संपत्तीच्या हव्यासापायी कित्येक नाती दुरावली जात असताना एका बहिणीने मात्र आपली किडनीदान करुन आपल्या भावाचे जीवन वाचवून जगापुढे एक आदर्श ठेवला आहे. सध्या हिंजवडी येथे कार्यरत व मूळची राहुरी.जि.अहमदनगर येथील रुपाली वेताळ-धनवडे (29 वर्षे) या तरुणीने भाऊ योगेश वेताळ (30 वर्षे) यास आपली किडनीदान करुन आयुष्याचे 'दान' दिले आहे .

विशेष बाब म्हणजे आज या घटनेला एक वर्षे पूर्ण होत असून, भावाचे प्राण वाचवण्यात आपला वाटा असून त्याचे आत्मिक समाधान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. रुपाली या हिंजवडी येथील अॅक्सिस बॅंकेत कर्ज विभागात कार्यरत आहेत तर भाऊ योगेश हे राहुरीला सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. योगेश यांना मागील वर्षी पोटाचा त्रास होत असल्याने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु राहुरी येथील डॉक्टरांच्या सल्ल्याने पुण्यात आणले गेले.

एका खाजगी दवाखान्यात तपासणी केल्यानंतर दोन्ही किडन्यांचा आकार कमी झाल्याने निकामी झाल्या असून त्याचे प्रत्यारोपण करणे हा एकच उपाय असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच मोठा मानसिक धक्का बसल्याचे रुपाली यांनी सांगितले. दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे समजल्यानंतरही भावाने मनाची तयारी केली होती. मात्र, वैद्यकीय बाबी जुळत असल्याने अखेर रुपाली यांनी किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार किडनीदान करण्यात आले. आज या दोघा भाऊ-बहिणीची प्रकृती स्थिर आहे. 

Web Title: Sister Donated her kidney save life of her brother