मेव्हणीचा खून करून मृतदेह जाळला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

पुणे - दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी दिल्यामुळे मेव्हणीचे अपहरण करून तिचा खून केल्याची घटना स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिचा चाकण येथे पुरलेला मृतदेह बाहेर काढून बार्शीजवळील शेतात जाळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 

अश्‍विनी शिवकुमार परदेशी (वय 25, रा. गुलटेकडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद अर्जुन ताकभाते (वय 29, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. त्याचा एक साथीदार फरारी आहे. मृत अश्‍विनीची बहीण स्वाती ताकभाते (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरीक्षक (गुन्हे) राम राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्‍विनी 5 जानेवारी रोजी सायंकाळी बेपत्ता झाल्याची तक्रार तिची आई राजश्री यांनी दिली होती. अश्‍विनीचे नदीम नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे ती नदीमसोबत गेल्याची शक्‍यता गृहीत धरून पोलिसांनी चौकशी केली. पण अश्‍विनीच्या संमतीने त्याचे एका तरुणीसमवेत आईवडिलांनी लग्न लावून दिल्याचे समोर आले. पोलिसांनी अपहरण आणि खंडणीची शक्‍यता पडताळून पाहिली. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नाही. तपास अधिकारी राजमाने यांनी अश्‍विनीची बहीण स्वाती हिच्याकडे महिला उपनिरीक्षक क्षीरसागर यांच्या मदतीने चौकशी सुरू केली. स्वातीचे गोविंदसोबत आळंदीत लग्न झाले होते. परंतु, त्याच्या आईला ते मान्य नव्हते. त्यामुळे तो अधून-मधून स्वातीकडे येत असे. गोविंदने दुसरे लग्न केल्याचे अश्‍विनीला समजले. तो मोठ्या बहिणीला नीट सांभाळत नसल्याने अश्‍विनी आणि गोविंद यांच्यात वाद होत असे. अश्‍विनीने स्वातीच्या मुलांना गोविंदच्या आईकडे सोडण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्याने साथीदार माऊलीच्या मदतीने अश्‍विनीला सारसबागेजवळ बोलावले. तिला मोटारीत बसवून डोक्‍यात दांडक्‍याने वार करून खून केला. त्यानंतर तळेगाव-चाकण रस्त्यालगत तिचा मृतदेह पुरला. तरीही पोलिसांना मृतदेह सापडेल या भीतीने त्यांनी मृतदेह काढून बार्शी तालुक्‍यातील खांडवी गावात शेतात जाळला. 

पोलिस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव बाबर, राम राजमाने, सहायक निरीक्षक मोरे, कर्मचारी संतोष क्षीरसागर, योगेश जगताप, सुनील कुलकर्णी, सज्जाद शेख, शकील शेख, दशरथ गभाले, रामचंद्र गुरव, श्रद्धा अकोलकर, घोडके, शीतकाल, भोकरे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. 

पोलिसांचीही केली दिशाभूल 
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी गोविंद याने प्रियकर नदीमला अश्‍विनी मुंबईत एका डान्सबारमध्ये काम करीत आहे. तिचे लग्न झाले असून, ती सुखरूप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे अश्‍विनीचा खून करून ती बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गोविंद पत्नीसह पोलिस चौकीत गेला होता. 

Web Title: Sister-in-law's murder