Loksabha 2019 : बारामती लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध

अनिल सावळे
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

बारामती लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपच्या रंजना सुभाष कुल यांचा समावेश आहे.

लोकसभा 2019
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सहा उमेदवारांचे 9 अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने भाजपच्या रंजना सुभाष कुल यांचा समावेश आहे.

अवैध अर्ज ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे :
शिवाजी कोकरे (अपक्ष)
विजयप्रकाश कोंडेकर (अपक्ष)
राजाराम जगताप (अपक्ष)
सचिन बाळकृष्ण जाधव (अपक्ष)
प्रज्ञा कांबळे (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया)

पुणे लोकसभा मतदारसंघातून तीन उमेदवारांचे चार अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.
अर्ज अवैध ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची नावे : 
जय कृष्णा शेट्टी
देवेंद्रकुमार ठक्कर
अंकुशराव पाटील

Web Title: Six candidate applications for Baramati Lok Sabha constituency are invalid