पुणे: बेकरीला आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे : कोंढवा बुद्रुक येथील 'बेक्‍स अँड केक्‍स' या बेकरीस आज (शुक्रवार) पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली. या आगीत बेकरीमधील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 

हे कामगार काल रात्री बेकरीमध्येच झोपले होते. बेकरीला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे आग लागल्यानंतर कामगार बेकरीतच अडकून पडले. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या आगीत बेकरी जळून खाक झाली आहे. 

या आगीमध्ये इर्शाद खान (वय 26), शानू अन्सारी (22), झाकीर अन्सारी (24), फहीम अन्सारी (21), जुनैद अन्सारी (25), झिशान अन्सारी (21) यांचा मृत्यु झाला. हे सर्व मूळचे उत्तर प्रदेशचे होते. 

Web Title: Six dead after fire broke out at a bakery shop in Pune