पोलिस कर्मचाऱ्यांनेच सहकाऱ्यांसह गुटखा गोदामावर मारला डल्ला

जनार्दन दांडगे
बुधवार, 22 मे 2019

लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली आहे. 

लोणी काळभोर : जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेतील पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने नगर जिल्ह्यातील निघोज (ता. पारनेर) येथील व्यापाऱ्याच्या गुटखा गोदामावर डल्ला मारुन सहा लाख रुपये किमतीचा गुटख्याची चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस आली आहे. चोरीचा प्रकार रविवारी (ता. 19) पहाटे घडला आहे. या प्रकरणाची माहिती बुधवारी (ता. 22) मिळताच पोपट गायकवाड यास तात्काळ निलंबित केले असल्याची माहीती जिल्हा (ग्रामिन) पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.

दरम्यान पोपट गायकवाड याने सहा महिन्यापुर्वी स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेतील एका वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने लोणीकंद पोलिसांच्या हद्दीतील एका गुटखा व्यापाऱ्याचे अपहरण करुन, व्यापाऱ्याकडुन तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. या प्रकरणाची चौकशी अंतीम टप्प्यात आली असतानाच, पोपट गायकवाड याचा आणखी एक कारनामा उघड झाल्याने ग्रामीण पोलिसांची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली आहे. 

पोपट गायकवाड याने स्थानिक गुन्हे शाखे्त काम करण्यापुर्वी शिरुर व शिक्रापुर परिरासरात काही काळ नोकरी केली आहे. पोलिस दलातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याच्या शिफारशीमुळे वर्षभऱापुर्वी पोपट गायकवाड याला स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेत रुजु करुन घेण्यात आले होते. पोलिस दलात भरती होण्यापुर्वी पोपट गायकवाड हा पोलिस दलातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यासह शिरुर व शिक्रापुर पोलिसांचा कलेक्टर म्हणुन काम करत असल्याने, गायकवाड याचे शिरुर, दौड, रांजणगाव गणपती व शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक दोन नंबर वाल्याशी चांगले संबध आहेत. याच संबधांच्या जोरावर मागिल वर्षभरापासुन पोटपट गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेत काम करण्याबरोबरच नगर रस्त्यावर गुटखा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेऊन होता. यातून सहा महिन्यांपुर्वी लोणी कंद हद्दीतील व्यापाऱ्याकडुन खंडनी वसुल केली होती तर रविवारी (ता. 19) निघोज मधील व्यापऱ्याच्या गोदामावर डल्ला मारण्यास यशस्वी झाला होता.

स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेतील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अऩ्वेशन शाखेतील एक अधिकारी, दोन वरीष्ठ पोलिस कर्मचारी व पोपट गायकवाड अशा चौघांनी सहा महिन्यापुर्वी लोणीकंद हद्दीतील एका गुटखा व्यापाऱ्याला पोलिस वाहनात घालून, त्याच्याकडुन तीन लाख रुपयांची खंडणी वसुल केली होती. या प्रकरणाची चौकशी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. पोपट गायकवाड हा पोलिस दलात भरती होण्यापुर्वी पोलिसांची वसुली करत असल्याने, त्याला नगर रस्त्यावरील सर्व दोन नंबरवाल्याची माहिती आहे. त्यातुनच गायकवाड वरील धंदे करीत आहे. गायकवाड याच्या प्रमाणेच पुर्व हवेलीत काही स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी वसुली करीत असुन, या सर्वांचीच चौकशी होण्याची गरज आहे. 

जरब बसेल अशी कारवाई करणार- संदीप पाटील
याबाबत पोलिस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले, पोपट मुरलीधर गायकवाड (बक्कल नंबर 1747) या पोलिस कर्मचाऱ्याने केलेला गुन्हा पोलिस दलाची प्रतिमा खऱाब करणारा असल्याने, गायकवाड यास तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. लोणीकंद पोलिसांच्या हद्दीतील एका गुटखा व्यापाऱ्याचे अपहरण करुन, व्यापाऱ्याकडुन तीन लाख रुपयांची खंडणी उकळले असल्याच्या प्रकरणाची माहिती घेण्याचे काम चालु असुन, या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस खात्यात राहुन, पोलिस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्यांना जरब बसेल अशी कारवाई करण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six lakhs theft in Gutkha godown by Police officer along with co-workers