सहा आमदारांना प्रमोशन मिळूनही होणार नाही पोटनिवडणूक ! 

Six MLAs get promotions but bypoll elections will not happen
Six MLAs get promotions but bypoll elections will not happen

पुणे : राज्यातून सहा आमदारांना खासदारीकचे प्रमोशन मिळाले असले तरी, विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत असल्यामुळे त्यांनी राजीनामे दिले तरी, तेथे पोटनिवडणूक होणार नाही. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा मंजूर केल्यावर सहा महिन्यांत निवडणूक घ्यावी लागते. परंतु, तत्पूर्वीच विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. 

भाजपचे गिरीश बापट, उन्मेष पाटील, 'एमआयएम'चे इम्तियाज जलील, शिवसेनेचे बाळू धानोरकर, हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, या आमदारांनी लोकसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ते खासदार झाले आहेत. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार खासदारपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांना आमदारापदाचा राजीनामा द्यावा लागतो. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपती भाजपला आमंत्रित करतील. त्यानंतर सरकार स्थापन होईल. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ अस्तित्त्वात येईल. त्यानंतर नव्या खासदारांना शपथ घेण्यासाठी विशेष अधिवेशन जाहीर केले जाईल. त्यात शपथ घेतल्यावर त्यांचे खासदारपद अस्तित्त्वात येईल.

परंतु, या प्रक्रियेला आणखी किमान 15 दिवस लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खासदारकीच्या शपथविधीची तारीख जाहीर झाल्यावर हे सहा नेते तत्पूर्वी दोन-तीन दिवस अगोदर आमदारकीचा राजीनामा देतील. तोपर्यंत आमदार म्हणून ते त्यांचा कालावधी प्रशासकीय कामांसाठी वापरू शकतात.

दरम्यान आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर पालकमंत्री पदावर मी रहाणार नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेची मुदत ऑक्‍टोबरपर्यंत आहे. त्यामुळे या आमदारांनी राजीनामे दिले तरी, सहा महिन्यांपूर्वीच विधानसभेचा कालावधी संतुष्टात येत असल्यामुळे पोटनिवडणूक होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे या सहा विधासभा मतदारसंघांना पुढील चार महिने आमदार नसेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com