तरुणाच्या हत्येप्रकरणी सहा जणांना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे : पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी सहा तरुणांना जन्मठेप आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी सुनावली.

नागेश साहेबराव गायकवाड (वय 20), महेश उर्फ जॅकी मच्छिंद्र कांबळे (वय 19), ओंकार सचिन बांदल (वय 23), विकी बबन ओव्हाळ (वय 20), दीपक श्रीरंग शिंदे (वय 29, पाचही रा. बालाजी नगर, भोसरी) आणि राजू भीमराव हाके (वय 21, आदर्शनगर, मोशी) यांना शिक्षा झाली आहे. रामा भीमराव गोटे (वय 19, बाळजीनगर, भोसरी) यांचा 14 फेब्रुवारी 2015 रोजी भोसरी एमआयडीसी परिसरात खून झाला होता.

आरोपींनी केलेल्या हल्ल्यात राजेश मनोहर स्वामी (वय 19, दापोडी), लखनकुमार गायकवाड (वय 19, बालाजीनगर, भोसरी) यांच्याही खुनाचा प्रयत्न केला होता. याबाबत तेव्हा जखमी झालेला राजेश मनोहर स्वामी यांनी फिर्याद दिली.

Web Title: Six people have been given life imprisonment in connection with the murder of the youth