सहा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; काय आहे कारवाईचं कारण?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

सध्या कारागृहात असलेला गुंड बापू नायर यास उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मारटकर खून प्रकरणातील आरोपींनी नायर याची भेट घेतली होती.

पुणे : शिवसेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणामध्ये कुचराई केल्याबद्दल सहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. गुंड बापू नायर आणि मारटकर खून प्रकरणातील आरोपींची ससून रुग्णालयात भेट झाल्याच्या कारणावरुन त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. 

पुणे : छाप्यावेळी हाती आलं घबाड; बड्या राजकीय व्यक्तीशी संबंधित कागदपत्रे पोलिसांच्या हाती​

राजकीय वैमनस्यातून दीपक मारटकर यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये फरासखाना पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. दरम्यान, सध्या कारागृहात असलेला गुंड बापू नायर यास उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी मारटकर खून प्रकरणातील आरोपींनी नायर याची भेट घेतली होती. त्यानंतर मारटकर यांचा खून झाला होता. नायर याच्याभोवती पोलिस बंदोबस्त असतानाही आरोपी त्याला कसे भेटले, याबाबत तपास करण्यात आला होता.

पुणेकरांनो, उद्याने खुली होणार पण...; महापालिका आयुक्तांचा आदेश वाचाच​

त्यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची कसून चौकशी करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता. त्याची गांभीर्याने दखल घेत संबंधित सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पोलिसांनी कामात कुचराई करीत पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six policemen suspended in connection with murder of Deepak Maratkar