वरवंड-परीसरात बिबटयाच्या हल्ल्यात सहा मेंढयाचा मृत्यू, तर दोन जखमी

अमर परदेशी
Tuesday, 12 January 2021


वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली. मागील आठ दिवसापासून वरवंड परिसरात बिबटयाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. आज पर्यंत ठिकठिकाणी बिबटयाच्या हल्लात एकुण अकरा मेंढया तर एका कालवडीचा मृत्यू झाला आहे.

वरवंड : वरवंड (ता.दौंड) परिसरात बिबटयाने पुन्हा चांगलाच उच्छाद मांडला आहे. येथील टेंगळे वस्ती भागात मंगळवारी (ता.१२) बिबटयाने पहाटेच्या सुमारास मेंढयांच्या कळपावर हल्ला केल्याने सहा मेंढयांचा जागीच मृत्यू झाला तर दोन मेंढया गंभीर जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरात बिबटयाचे हल्ले वाढतच चालल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

वनविभागाने बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली. मागील आठ दिवसापासून वरवंड परीसरात बिबटयाने चांगलाच धुमाकुळ घातला आहे.आज पर्यंत ठिकठिकाणी बिबटयाच्या हल्लात एकुण अकरा मेंढया तर एका कालवडीचा मृत्यू झाला आहे. पासोडी भागात नामदेव दिवेकर यांच्या एक कालवड,बारवकरवस्तीवर पिसे यांच्या दोन मेढया तसेच काही अंतरावर विनोद गायकवाड यांच्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

तीन दिवसापासुन बिबटया स्तलांतर झाल्याचे वाटत होते. मात्र, मंगळवारी बिबटयाने पुन्हा धुमाकुळ घातला. टेंगळेवस्ती भागात संभाजी नामदेव टेंगले यांच्या घरासमोर गुरांचा गोठा तसेच मेंढयांसाठी वाघर आहे. बिबटयाने पहाटेच्या सुमारास वाघर तोडुन मेंढयांच्या कळपावर हल्ला केला. मेंढयांच्या आवाज येऊ लावल्याने संभाजी हे लगबगीने घराबाहेर आले. त्यावेळी बिबटयाचा रुद्ररुप धारण करीत मेंढयावर हल्ला सुरु होता. संभाजी यांनी आरडा-ओरडा करताच बिबटयाने बाजुच्या उसात पळ काढला. या हल्ल्यात सहा मेंढयांचा जागीच मृत्यू झाला.तर दोन जखमी झाल्या आहे.

पुण्यासाठी सोमवार ठरला 'अपघातवार'; ६ तासात झाले ६ अपघात​

मृतामधील एक मेंढी बिबटयाने पळुन नेली. वाघरीत मेंढयांच्या रक्ताचे सडे व छिन्न विचिन्न अवस्थेत पडलेले अवयव पाहुन अनेकांनी हळहळ व्यक्ती केली. माहीती मिळताच वनपरीमंडल अधिकारी चैतन्य कांबळे, वनकर्मचारी भरत शितोळे,अविनाश वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी संभाजी टेंगले,तानाजी दिवेकर, नामदेव बारकर, धनाजी टेंगले, कांता टेंगले, प्रकाश टेंगले, रामदास टेंगले आदी उपस्थीत होते. वन अधिकाऱयांनी परीसराची पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला.

याबाबत वनपाल कांबळे म्हणाले, ''बिबटयाच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या मेंढयांचा पंचनामा केला आहे. परिसरात बिबटयाचे वास्तव्य आहे. नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. रात्रीच्यावेळी एकटयाने फिरू नये. पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.

सदाशिव पेठेत खळबळ; बांधकाम सुरू असलेल्या बिल्डींगमध्ये सापडला महिलेचा मृतदेह​ 

रामदास टेंगले म्हणाले, ''बिबटयाच्या हल्यात सहा मेंढयांचा मृत्यू झाल्याने शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाकडुन तत्काळ नुकसान भरपाइ मिळावी.तसेच पिंजरा लावुन बिबटयाचा बंदोबस्त करावा.''
 

'कोरेगाव भीमा'च्या आरोपपत्रातून संभाजी भिडेंचं नाव वगळलं; रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six sheep die and two injured in leopard attack in Varvand area