कीटकनाशक मारलेली भाजी खाल्ल्याने शेतकऱ्याच्या सहा मेंढ्यांचा मृत्यू 

दत्ता जाधव
Thursday, 26 November 2020

पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील पोंढे येथील विष्णू पांडुरंग वाघले या शेतकऱ्याच्या मेंढ्यांनी शेतातील कीटकनाशक मारलेली पालक भाजी खाल्ल्याने त्या शेतातून बाहेर येताच रस्त्यानेच सहा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे अगोदरच अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्या वरती हे मोठे आर्थिक संकट आले आहे.

माळशिरस - पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील पोंढे येथील विष्णू पांडुरंग वाघले या शेतकऱ्याच्या मेंढ्यांनी शेतातील कीटकनाशक मारलेली पालक भाजी खाल्ल्याने त्या शेतातून बाहेर येताच रस्त्यानेच सहा मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे अगोदरच अतिवृष्टीमुळे अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्या वरती हे मोठे आर्थिक संकट आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथील विष्णू वाघले यांचा बागायती शेतीबरोबरच मेंढपाळाचा ते व्यवसाय करतात. त्यांच्याच घरातील भावाच्या शेतामध्ये पालक भाजी काढून दिल्यानंतर राहिलेला खोडव्यामध्ये त्यांचा मुलगा भिवाजी वाघले याने बकरी चरावयास सोडली होती. चारा खाऊन ही बकरी शेतातून बाहेर येऊन रस्त्याला लागताच पटापट पडू लागली. यातील सहा मेंढ्यांचा रस्त्यावरतीच पडून मृत्यू झाला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पालक भाजी काढण्यापूर्वी सुरुवातीला कोराजेन हे किटकनाशक मारले होते. त्यानंतर पालक काढून खोडवा फुटलेल्या भाजीमध्ये ही बखरीत चरले असता हा प्रकार घडल्याचे श्री वाघले यांनी सांगितले. यामुळे  पन्नास हजाराच्या वर आर्थिक नुकसान झाले आहे असे त्यांनी सांगितले.

गुंजवणी पाईप लाईनला शेतकऱ्यांचा विरोध

मेंढपाळ व्यवसायिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे -
सहा मेंढ्या दगावल्याने या शेतकऱ्याला मदत  मिळणे गरजेचे असून अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हे मोठे आर्थिक संकट असल्याने त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंच नारायण वाघले व माजी सरपंच संपत वाघले यांनी केली. दरम्यान, सध्याच्या ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या कडून कीडनियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर केला जात असल्याने मेंढपाळांनी देखील आपल्या मेंढ्या चारताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six sheep farmer die after eating pesticide treated vegetables