जुन्नरमध्ये सहा गावांना टॅंकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

जुन्नर - पावसाने ओढ दिल्याने जुन्नरला अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने जूनच्या अखेरीस टॅंकरचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या वर्षी निम्मा जून महिना संपला तरी ६ गावे व ७८ वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर मागील वर्षी २ एप्रिलपासून ६ गावे व ८१ वाड्यांवरील १५ हजार ८१५ लोकवस्तीला ६ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

तालुक्‍यात बुधवारी (ता. २१) कोपरे, मांडवे, मुथाळणे, शिंदेवाडी, नळवणे, आणे गावच्या वाड्या, आलमे, घोडेमाळ, अळू, जळवंडी आदी गावे व वाड्यांना २ शासकीय व ४ खासगी अशा एकूण सहा टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील सुमारे १७ हजार लोकवस्ती टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. यासाठी १२ विहिरीचे अधिग्रहण केले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश गाढवे व पाणीपुरवठा तांत्रिक विभाग प्रमुख आत्माराम कसबे यांनी दिली. आदिवासी भागातील अंजनावळे, सुकाळवेढे, हातविज येथे जूनच्या सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने येथील टॅंकर बंद करण्यात आला होता. तांत्रिक विभागातर्फे आदिवासी भागातील दुर्गवाडी, दुर्गादेवी मंदिर आदी १२ ठिकाणी विंधन विहिरी घेण्यात आल्या. त्या सर्व यशस्वी झाल्या.

Web Title: six village water tanker