Pune : अंतुलेनगरमध्ये विहिरीत पडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव
six-year-old boy died after falling into well in Antulenagar Yevlewadi pune police
six-year-old boy died after falling into well in Antulenagar Yevlewadi pune policeesakal

कोंढवा : येवलेवाडीजवळील अंतुलेनगरमध्ये विहिरीत पडून एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. साई भगवान यादव असे मृत मुलाचे नाव आहे. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मुलगा पडलेल्या विहिरीला बाहेरून जाळी लावण्यात आली होती. मात्र, जाळीला पाणी काढण्यासाठी करण्यात आलेल्या फटीतून मुलगा विहरीत पडला. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, विहरीतून मुलगा बाहेर काढण्यास तब्बल तीन तास लागले. सायंकाळी सहाच्या सुमारास मुलाचा मृतदेह हाती लागला. कोंढवा अग्निशामक दलाचे समीर शेख, योगेश जगताप, रवींद्र हिवरकर, अनिल खरात, तांडेल सोपान कांबळे, शौकत शेख, तेजस खरीवले आदींनी हे शोधकार्य पूर्ण केले. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com