
महावितरणच्या नगर रस्ता विभागांतर्गत शास्त्रीनगर, विश्रांतवाडी, कल्याणीनगर व खराडी हे उपविभाग येतात. या सर्व उपविभागातुन मीटरची मागणी नगर रस्ता विभागाकडे नोंदवली जाते. सध्या सर्व उपविभाग मीळून सुमारे सोळाशे मीटर ची मागणी नोंदवण्यात आली आहे.
वडगाव शेरी(पुणे) : महावितरणच्या नगर रस्ता विभागात विजमीटर उपलब्ध नसल्याने शेकडो नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नव्या वीजमीटरसाठी महावितरणकडे पैसे भरलेले ग्राहक गेल्या महिनाभरापासून प्रतिक्षेत आहेत. अधिकृत खाजगी वितारकांकडून मीटर घेण्याची ग्राहकांना मुभा देण्यात आली असली तरी बाजारातही मीटर उपलब्द्ध नाहीत. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा द्विधा अवस्थेत नागरिक सापडले आहेत.
महावितरणच्या नगर रस्ता विभागांतर्गत शास्त्रीनगर, विश्रांतवाडी, कल्याणीनगर व खराडी हे उपविभाग येतात. या सर्व उपविभागातुन मीटरची मागणी नगर रस्ता विभागाकडे नोंदवली जाते. सध्या सर्व उपविभाग मीळून सुमारे सोळाशे मीटर ची मागणी नोंदवण्यात आली आहे.
-
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
त्यातील घरगूती व सिंगल फेजचे आठशे व थ्री फेज च्या मीटरसाठी आठशे नागरिकांनी मागणी अर्ज सादर केले आहेत. याविषयी स्थानिक नागरिक गौरव शर्मा म्हणाले, आम्ही घरगुती मीटर साठी महावितरणकडे पैसे भरले. परंतु मीटर उपलब्ध नसल्याने तुम्ही बाहेरून मीटर आणा. आम्ही तो लावून देऊ. असे सांगण्यात आले. परंतु खाजगी वितरकांकडेही मीटर उपलब्ध नसल्याने आम्हाला हेलपाटा पडला.
मीटर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेकडे आल्यानंतर शिवसेनेचे शहर संघटक नितीन भुजबळ यांनी याबाबत महावितरणकडे विचारणा केली. तसेच मीटरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
याविषयी नितीन भुजबळ म्हणाले, विज बिल थकल्यामुळे महावितरण चे उत्पन्न घटले आहे. तर दुसरीकडे मात्र पैसे भरलेले नागरिक नव्या मीटरची प्रतीक्षा करताहेत. पैसे भरूनही ग्राहकांना खाजगी वितरकांकडून मीटर घ्या असे अधिकारी सांगत आहेत. मीटरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांनी खासगी वितरकांकडे जावे असा काही प्रकार आहे का, याची चौकशी करण्यात यावी.
नगर रस्ता विभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव म्हणाले, पुणे शहर आणि जिल्ह्यातच विजमीटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्या ग्राहकांना तातडीने मीटरची गरज आहे त्यांना फक्त बाहेरून मीटर आणण्यासाठी सांगितले जाते. मुख्य कार्यालयाकडे मीटरची मागणी नोंदवली आहे. सोळाशे ग्राहक प्रतीक्षेत आहेत. प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्याने मीटर दिले जातात.