पीएमपीच्या ताफ्यात महिनाअखेरीस ६५ बस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ६५ बस महिनाअखेरीस मार्गावर धावण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नव्या बसचा लोकार्पण सोहळा करण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या ६५ बस महिनाअखेरीस मार्गावर धावण्याची चिन्हे आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत नव्या बसचा लोकार्पण सोहळा करण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. हा कार्यक्रम पिंपरी चिंचवडमध्ये होणार असल्याचेही  त्यांनी सांगितले.  

पीएमपीच्या ताफ्यात ३३ ई- बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या ३२ बस आल्या आहेत. या बसला दोन्ही बाजूने दरवाजे असल्यामुळे त्या बीआरटी मार्गांवरही धावू शकतील. प्रती बस ३२ आसन क्षमता आहे. बसच्या लोकार्पण सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी पीएमपीच्या संचालक मंडळाची गुरुवारी बैठक होती. परंतु, गणसंख्येअभावी ती तहकूब  केली. 

दोन्ही महापालिकांनी मिळून १२५ ई बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या ४०० बसची ऑर्डर दिली आहे. त्यातील २५ ई बस आलेल्या आहेत. उर्वरित ६७ बससाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यातील १५ आणि सीएनजीवरील आणखी २० बस मिळाल्यास १०० बसचा लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही महापौरांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sixty five buses in PMP At the end of month