Sixty people in Junnar taluka awarded by Gunavant Teacher Award
Sixty people in Junnar taluka awarded by Gunavant Teacher Award

जुन्नर तालुक्यातील साठ जणांना गुणवंत शिक्षक पुरस्कार 

जुन्नर - पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील 41 प्राथमिक तसेच 13 माध्यमिक शिक्षकासह, दोन केंद्र प्रमुख, प्रत्येकी एक विस्तार अधिकारी, लिपीक, विषय तज्ञ व अपंग समावेशित शिक्षक अशा शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक, अध्यक्ष चषक प्राप्त शाळा व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. 

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,आमदार शरद सोनवणे, सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य याच्या उपस्थितीत शाल, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बुके देऊन शिक्षकांना गौरविण्यात आले. गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी स्वागत केले. सुनिता वामन व भाऊसाहेब खाडे यांनी सुत्रसंचालन केले. आभार के. बी. खोडदे यांनी मानले.

पुरस्कार प्राप्त शिक्षक :

  • प्राथमिक :
    बाळू पांडुरंग दिघे. तुकाराम किसन वंडेकर. शंकर रामा ढेंगळे. सुनिता ज्ञानेश्वर कारभळ. पंढरीनाथ धोंडू शेळ्कंदे. बाळू बुधाजी लांघी. सुरेश किसन डामसे. दिलीप काळूराम लोहकरे. जयराम सोमा डामसे. हिरा तुकाराम लोहकरे. महादू खंडू घोलप. वर्षा सुधाकर घुले. अभिलाषा भास्कर बोडके. सुरेश गोपीचंद सूर्यवंशी. कमल संतोष मोढवे. मीनाक्षी विजय चौधरी. आशा संजय गुलधेकर. धोंडीभाऊ धर्माजी दाते. शिवाजी हरीभाऊ माळी. नंदाराम रोहीदास टेकावडे. सुरेश तुकाराम शेळकंदे. पुष्पलता संजय डुंबरे. स्वाती राजेंद्र विश्वे. मनीषा सुनील शिंदे. निलेश धोंडीभाऊ शिंगोटे.अनिता संदीप ठिकेकर. ज्योती शरद वारुळे. कल्पना नानाभाऊ कणसे. अनिल गोविंद कुटे. सलीम इस्माईल शेख. तानाजी दत्तात्रय जाधव. मालती दिलीप गोसावी. कैलास नाथाजी फापाळे. देवयानी भास्कर काशीद. दिलीप पुंजाजी वाळके. रवींद्र दशरथ पानसरे. विद्या गणेश राऊत. सुषमा आमित डुंबरे. उषा दत्तू शेळकंदे. योगेश चंद्रकांत खेत्री. किरण सहादू रावते.   
  • माध्यमिक शिक्षक : 
    विनायक लक्ष्मण खोत, खामगाव. स्नेहल यशवंत दाते, धामणखेल. याकुब इब्राहीम शेख, खामुंडी. मंगल रामदास साबळे गाडगे, ओतूर. उज्ज्वला भाऊसाहेब खाडे, ओझर. संजय हरिभाऊ डुंबरे, येणेरे. शिवाजी दत्तू कुमकर, शिरोली बोरी. बबन कृष्णाजी नलावडे, उंब्रज नं. 2. गणपत शंकर अभंग, येडगाव. कैलास बाबुराव शिंदे, आळेफाटा. हरिदास किसन सांडभोर, पिंपळगाव जोगा. सुनील रामचंद्र रोकडे, नारायणगाव. विजय सदाशिव खरात, ओतूर. अनिता शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पलता पानसरे व कांताराम भोंडवे केंद्रप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com