भिगवण - दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शालेय गुणवत्ता विकास कार्यशाळा 

प्रशांत चवरे 
गुरुवार, 5 जुलै 2018

भिगवण (पुणे) : शिवम प्रतिष्ठान घारेवाडी(जि. सातारा) व येथील दत्तकला शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय मोफत शालेय गुणवत्ता विकास शिबीर घेण्यात आले. शिबीरामध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षर, अभिनय आदी कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला.

शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय गुणवत्ता विकास शिबीर हा उपक्रम राबविण्यात येतो. दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये आयोजित शिबीराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ यांचे उपस्थितीत करण्यात आले.

शिबीरामध्ये दत्तकला इंटरनॅशनल स्कुल सी.बी.एस.ई व एस.एस.सी मधील पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिवमचे बारामती विभाग प्रमुख अशोक सस्ते यांचे मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक सुहास प्रभावळे, स्टीफन शिंगे, अर्चना प्रभावळे, पूनम कदम, अक्षय शिंदे व स्वप्नील काळे यांनी मार्गदर्शन केले. हस्ताक्षर सुधार कार्यशाळा, क्राफ्ट काम, विज्ञान खेळणी बनविणे, वार्ली पेंटींग व अभिनय कौशल्य विकास आदी उपक्रम राबविण्यात आले. शिबीरार्थींनी तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे प्रबोधनपर पथनाट्य सादरीकरण केले त्यास ग्रामस्थांकडुनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

शिबीराचा समारोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयप्रकाश खऱड यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. स्कूल डायरेक्टर नंदा ताटे, संदीप काळे, प्राचार्य सिंधु यादव, उपप्राचार्या अंजली थोरात उपस्थित होते. डॉ. जयप्रकाश खऱड म्हणाले, अभ्यासक्रमाबरोबर विदयार्थांनी त्यांचेमध्ये असलेल्या कौशल्याचाही विचार केला पाहिजे. शालेय गुणवत्ता विकास शिबारे विदयार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी उपयुक्त ठरतील. शिबीर यशस्वी होण्यासाठी  दत्तकला शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिवम प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकानी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: skill development workshop in dattakala school bhigwan