यशस्वी होण्याकरिता कौशल्य आवश्‍यक : शिरोळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

"ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर', "डोमेस्टिक आय.टी. हेल्प डेस्क अटेंडंट', "फिल्ड टेक्‍निशियन नेटवर्किंग ऍण्ड स्टोरेज',"फिल्ड टेक्‍निशियन कॉम्प्युटिंग ऍण्ड पेरिफेरल्स्‌', "सुईंग मशिन ऑपरेटर', "हेअर स्टायलिस्ट', "रिटेल ट्रेनी असोसिएट' असे सात प्रकारचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.

पुणे : "गरिबी आणि बेरोजगारीशी लढण्यासाठी कौशल्य विकास महत्त्वाचा असतो. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रांत कौशल्याधिष्ठित व्यक्तींची नियुक्ती आवश्‍यक आहे. कारण कौशल्य असेल, तरच यशस्वी होता येईल,' असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी "स्किल डेव्हलपमेंट' योजनेअंतर्गत पुण्यातल्या पहिल्या "प्रधानमंत्री कौशल केंद्र'चे उद्‌घाटन खासदार शिरोळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. जहांगीर रुग्णालयासमोरील "सोहराब हॉल' इमारतीमध्ये हे केंद्र सुरू झाले असून, या प्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, आदित्य माळवे, केंद्राचे संचालक सिद्धार्थ रहाळकर आणि मनीष सिन्हा उपस्थित होते.

"ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर', "डोमेस्टिक आय.टी. हेल्प डेस्क अटेंडंट', "फिल्ड टेक्‍निशियन नेटवर्किंग ऍण्ड स्टोरेज',"फिल्ड टेक्‍निशियन कॉम्प्युटिंग ऍण्ड पेरिफेरल्स्‌', "सुईंग मशिन ऑपरेटर', "हेअर स्टायलिस्ट', "रिटेल ट्रेनी असोसिएट' असे सात प्रकारचे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत. पाचवी, दहावी, बारावी उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींसाठी तीन ते चार महिन्यांचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमदेखील येथे आहेत. 

Web Title: the Skill needed to succeed says MP Shirole