सेवानिवृत्त सैनिकांचे कौशल्य व अनुभवाचा उपयोग आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे

अक्षता पवार
Saturday, 2 January 2021

सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने  कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..!

पुणे - सैन्यातील १७ वर्षांच्या सेवेनंतर २०१३ मध्ये अनिल शिंदे निवृत्त झाले. वयाच्या ३८ व्या वर्षी निवृत्ती स्वीकारल्यानंतर पुढील नागरी जीवन कसे व्यतीत करावे, शिस्त आणि समयबद्धता आदी सैनिकी मूल्य नव्या नागरी आयुष्यात कसे स्वीकारले जाणार, सतरा वर्षांच्या सेवेत मोठ्या कष्टाने आणि धीराने कमावलेल्या कौशल्यांचा पुढील जीवनासाठी उपयोग कसा करायचा, अशा एक ना अनेक प्रश्‍नांनी शिंदे व त्यांच्यासारख्या माजी सैनिकांच्या मनात काहूर माजलेले असते..!

सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांचे कौशल व अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे आहे. बहुतांश माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, तर काही शेतीकडे वळतात. यातील फार कमी माजी सैनिकांना सरकारी नोकरी मिळते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील माजी सैनिकांच्या एका संघटनेत कार्याध्यक्ष असलेले शिंदे सांगतात, ‘‘बहुतांश माजी सैनिकांना निवृत्तीनंतर उपजीविकेसाठी तारेवरची कसरत करावी लागते. उत्पन्नासाठी त्यातील बहुतांशी माजी सैनिकांना सुरक्षा रक्षकाचे काम करावे लागते. तसेच त्यांच्या कौशल्याचा समाजात योग्यरीत्या वापर होत नाही. त्यांच्या कौशल्याचा  समाजाला फायदा होणे गरजेचे आहे.’’ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सैनिक महाउद्योगा’च्या माध्यमातून माजी सैनिकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

चुकीला माफी नाही; 'ड्रंक अँड ड्राईव्ह' अंतर्गत 132 जणांवर पुण्यात कारवाई

अशी झाली सैनिक महाउद्योगाची सुरुवात
लष्करात १८ ते २२ या वयात भरती होऊन वयाच्या ३८ ते ४५व्या वर्षी सैनिक सेवानिवृत्त होतात. मात्र, परिवाराची जबाबदारी, मुलांचे शिक्षण किंवा मुलींचा लग्नाचा खर्च फक्त सेवानिवृत्त वेतनावर (पेन्शन) भागत नसल्यामुळे आणि उच्च शिक्षणाच्या कमतरतेमुळे माजी सैनिकांसमोर केवळ सुरक्षा रक्षकाचा पर्याय असतो. बॅंका, सोसायट्या किंवा कंपनीच्या गेटवर अशा प्रकारचे काम करताना त्यांना सन्मान मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करत चांगले उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने ‘सैनिक महाउद्योग’ हे व्यासपीठ तयार केले आहे. यामध्ये खाद्य, शेते उत्पन्न, बांधकाम सारख्या क्षेत्रामध्ये व्यवसायाची संधी देण्यात येत आहे.

पुणेकरांनो, पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे; अजित पवारांनी दिले संकेत

असा होऊ शकतो कौशल्याचा वापर
‘लष्करात दाखल झाल्यावर सैनिकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये वैद्यकीय, मेकॅनिकल, अभियांत्रिकी, बांधकाम सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे. त्या आधारावर त्यांना अशा क्षेत्रात काम करण्याची संधी निवृत्ती नंतर मिळू शकते. तर त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि कौशल्याचा वापर करत उद्योग क्षेत्राला देखील  ते पुढे नेऊ शकतील आणि देशाचा आर्थिक पाया आणखीन सक्षम होण्यास मदत होईल. उत्पादनाशी निगडित विश्वासार्हता देखील वाढेल,’’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रेय शेकटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या पोरींनी इतिहास घडवला; राजपथावर परेडसाठी तिघींची निवड

ही आहेत कौशल्ये

  • शिस्तप्रिय आणि मेहनती  
  • विश्वासार्हता आणि प्रामाणिक 
  • नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारे
  • बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त

निवृत्तीनंतरची स्थिती

  • क्षेत्र - अंदाजे टक्केवारी
  • शेती - २० टक्के
  • सरकारी नोकरी - १० टक्के
  • सुरक्षा रक्षक (सिक्‍युरिटी गार्ड) - ७० टक्के

निवृत्त होणाऱ्या सैनिकांची संख्या (वार्षिक)

  • देशातून - ७५ ते ८० हजार
  • महाराष्ट्रातून - सुमारे ७ हजार

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: skills experience retired soldiers used self reliant India