प्राध्यापकांनी गिरवले कौशल्याचे धडे; लॉकडाउन सत्कारणी

Pune-University
Pune-University

पुणे - कोरोनाचा प्रत्येकाच्या मानसिकतेमध्ये बदल झाला. तो समजून घेऊन स्वतःमध्ये बदल करून त्यातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे. याच विचाराने प्राध्यापकांसाठी घेतलेल्या प्रशिक्षण शिबिरात देशाच्या सर्व भागातील ६५० जण सहभागी झाले होते. नवीन कौशल्य शिकण्यासाठी लॉकडाउनचा काळ सत्कारणी लागला, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातील प्राध्यापिका रजनी पंचांग सांगत होत्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘पुणे विद्यापीाठाने भाषा व साहित्य या विषयावर, नवे शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा घेतली, त्यामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक असल्याने दर्जेदार कोर्सेस झाले होते. त्याचा प्राध्यापकांना चांगला फायदा झाला आहे, असे नगरच्या न्यू आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेजचे डॉ. बाळासाहेब सागडे यांनी सांगितले. 

पुणे विद्यापीठात विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे ‘प्राध्यापक विकास केंद्र’ (फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर) कार्यरत आहे. येथे प्राध्यापकांना विविध विषयांवर प्रशिक्षण देऊन काळानुरूप कौशल्य आत्मसात व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. प्राध्यापकांना सेवेत अंतर्गत बढतीसाठी अशा ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ (एफडीपी)मध्ये सहभागी होणे आवश्‍यक असते. 

लॉकडाउनमुळे महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. प्राध्यापक त्यांना जमेल त्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच विचार करून पुणे विद्यापीठातील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’ने विविध प्रकारच्या ऑनलाइन कोर्सचे नियोजन केले होते. मे ते ऑक्‍टोबर २०२० या कालावधीत २० प्रशिक्षण शिबिर झाले असून, त्यामध्ये ५ हजार ४७९ प्राध्यापकांना प्रशिक्षण दिले आहे. यासाठी समन्वयक डॉ. सचिन साठे यांनी नियोजन केले होते. 

प्रशिक्षण वर्गात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विकास, शिक्षक आणि नीतिमूल्य, ग्रीन एनर्जी अँड रिनोएबल एनर्जी, योगासने आणि मानसिक आरोग्य, मॅथेमॅटिक्‍स ऑफ बायो सायन्स, ‘डेव्हलपमेंट, डिलिव्हरी अँड इव्हॅल्युएशन ऑफ इ कंटेन्ट फॉर कॉमर्स फॅकल्टी’ यासह २० विषयांवर कार्यशाळा झाल्या आहेत. इ-कंटेन्ट निर्मितीवर ४ कार्यशाळा झाल्या आहेत. 

शिक्षकांची ज्ञानवृद्धी आणि उच्च शिक्षणातील क्षमता विकास यासाठी प्राध्यापकांनी लॉकडाउन सत्कारणी लावला आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षणास महत्त्व देण्यात आले आहेत. शिक्षकांची क्षमता विकसित होत नाही, तोपर्यंत उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढणार नाही, त्यामुळेच प्रशिक्षण शिबिरांचे नियोजन केले होते. शिक्षकांच्या मागणी प्रमाणे ‘मॅथेमॅटिक्‍स फॉर बायोलॉजी’ या विषयावर देशभरात फक्त पुणे विद्यापीठाने कार्यशाळा आयोजित केली होती.
- डॉ. संजीव सोनवणे, संचालक, प्राध्यापक विकास केंद्र, पुणे विद्यापीठ

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com