युरोपात कोरोनाग्रस्त रुग्णाला त्वचारोग; अन् भारतात...

युरोपात कोरोनाग्रस्त रुग्णाला त्वचारोग; अन् भारतात...

पुणे : जगभरातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना त्वचारोग झाल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे हा त्वचारोग जरा हटकेच आहे. यामध्ये लाल रंगाची पुरळ, सपाट घाव, जखम, टोकदार पुरळ आदी प्रकारची लक्षणे दिसत आहे. कोविड-19च्या रुग्णांना त्वचारोग का होतो? याबद्दल डॉक्‍टरांनाही प्रश्‍न पडला आहे. प्रामुख्याने युरोपात हा प्रकार दिसतो पण भारतात काय? काय म्हणतात त्वचारोगतज्ज्ञ आणि नायडू हॉस्पिटलचे डॉक्‍टर.. 

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन आणि ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मिटॉलॉजीमध्ये यासंबंधी शोधनिबंध प्रकाशित झाले आहे. रुग्णांमध्ये आढळणारा हा त्वचारोग नक्की कोविड-19 च्या संसर्गामुळेच झाला आहे, असे अजून निश्‍चित सांगता येणार नाही. तसेच त्यावर सखोलवर संशोधन होणे गरजेचे आहे, असे मत कॅलिफोर्नियाती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. कानाडी शिंकाई यांनी व्यक्त केले आहे. कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला प्रतिक्रिया म्हणून त्वचेचे हे वर्तन असावे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहे. तसेच, त्याच्या प्रतिक्रियेचा पॅटर्नही ते अभ्यासणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आढळणारा हा त्वचारोग केवळ कोविड-19 विषाणूची प्रतिक्रिया नसणार. कदाचित रुग्णाला देण्यात येणारी औषधे किंवा उपचार पद्धतीचा परिणामही असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणतात.

देशातील त्वचारोगाबद्दल बोलताना पुण्यातील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धनश्री भिडे म्हणाल्या,"युरोप आणि अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या पायांच्या बोटाला त्वचारोग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासंबंधी शोधनिबंधही प्रकाशित झाले आहे. भारतातही असे होते का नाही याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.'' त्वचेच्या विकारावरून कोविडचा संसर्ग अभ्यासता येईल का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या,"कोरोनाचा प्रसार आणि आक्रमकता बघता कोरडा खोकला, ताप, सर्दी अशा लक्षणांवरुनच अंदाज घेणे योग्य ठरेल. कोरोना रुग्णाला असा त्वचारोग का होतो आणि तो निदानासाठी कितपत योग्य आहे. याबद्दल आपल्याकडे कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नाही.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

गोवर, कांजण्या आदी संसर्गजन्य आजारांमध्ये त्वचारोग झाल्याचे पाहायला मिळते. विशेषतः लहान मुलांमध्ये असे प्रकार आढळतात. परंतु ज्येष्ठांमध्येही याच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. इटलीमध्ये 20 टक्के कोरोना रुग्णांना त्वचारोग झाल्याचे शोधनिबंधातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोविड-19च्या दुसऱ्या टप्प्यातील परिणाम म्हणून याकडे पाहणे आणि अभ्यासणे गरजेचे आहे. भारतात अजूनही यासंबंधी कोणतेच संशोधन झालेले नाही. 

डॉ.नायडू संसर्गजन्य रुग्णालयात दाखल कोरोनाबाधितांमध्ये अशा प्रकारची कोणतीही लक्षणे अजून आढळलेली नाहीत. त्यामुळे भारतातही त्वचारोगाचा हा पॅटर्न पहायला मिळेल, असे लगेच सांगता येणार नाही. आम्ही अजूनही इतर वैद्यकीय परिणामांचा अभ्यास करत आहे. 

- डॉ. अरविंद परमार, नायडू रुग्णालय, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com