चार दिवस राहणार आकाश ढगाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

पुणे - सिंहगड रस्ता, पाषाण आणि आंबेगाव परिसरांत ढगांच्या गडगडाटासह मंगळवारी संध्याकाळी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. शहर आणि परिसरात पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहणार असून, येत्या रविवारी (ता. २८) व सोमवारी (ता. २९) काही भागात पावसाच्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. 

शहरात सकाळपासून उन्हाचा कडक चटका होता. संध्याकाळनंतर सिंहगड परिसरात ढगांचा गडगडाट होऊन पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. उर्वरित शहरात मात्र आकाश अंशतः ढगाळ होते. पुढील चोवीस तासांमध्ये उन्हाचा कडाका कायम राहणार आहे. त्यामुळे येत्या बुधवारीही (ता. २४) कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

कमाल तापमानातही सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदविण्यात आले. शहरात मेमध्ये सरासरी किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस असते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कमाल तापमानाचा पारा २.६ अंश सेल्सिअसने वाढून २५ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुढील दोन दिवस रात्रीचा उकाडादेखील कायम राहणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

Web Title: The sky will remain cloudy for four days