राँग नंबर; ठेंगणे अंबर!

‘अहो, बघा ना. कोरोनामुळे सर्वसामान्य माणसांचे किती हाल होत आहेत.’ टीव्हीवरील बातम्या पाहून गहिवरल्या सुरात प्रज्ञा परेशला म्हणाली. नंतर तिच्या डोळ्यात पाणी आले.
Panchnama
PanchnamaSakal

‘अहो, बघा ना. कोरोनामुळे सर्वसामान्य माणसांचे किती हाल होत आहेत.’ टीव्हीवरील बातम्या पाहून गहिवरल्या सुरात प्रज्ञा परेशला म्हणाली. नंतर तिच्या डोळ्यात पाणी आले.

‘आपण गरीब लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे. मी माझे जुने ड्रेस गरीब महिलांना दान करते.’ प्रज्ञाने डोळे पुसत म्हटले. ‘अच्छा ! म्हणजे हिचे अश्रू मगरीचे आहेत तर! टीव्हीवरील बातम्या बघून हिला बरंच काही सुचतंय तर!

जुने कपडे दान करून, लगेचच नवीन ड्रेसचा लकडा आपल्यामागे लावायचा हिचा विचार आहे,’ परेशने मनात म्हटले.

‘अगं पण तुझे जुने ड्रेस ज्या महिलांना येतील, त्या गरीब कशा असतील?’ असा प्रश्‍न परेशने विचारला. मात्र, आपल्या लठ्ठपणाला हा टोमणा असल्याचे प्रज्ञाच्या लक्षात आले नाही.

‘जुने ड्रेस देण्यापेक्षा नवीन दिलेले केव्हाही चांगले.’ परेशने म्हटले. मात्र, प्रज्ञाने त्याला नकार दिला.

‘आपण आपल्या सोसायटीतील महिलांसाठी हळदी-कुंकवांचा कार्यक्रम घेऊया व त्यात काहीतरी वाटूया. सी विंगमधल्या सोनवणेबाईंनी मास्क वाटल्यापासून ती खूप भाव खातीया. तिने वाटलेला मास्क असेल फार तर पाच-सहा रुपयांचा पण ब्रॅंडेड आहेत, असे सांगून मिरवतीया. ‘कसा वाटला मास्क’ असं भेटेल त्याला विचारतीया.

Panchnama
म्युकरमायकोसिस रुग्णांचा शोध घरोघरी जाऊन घेणार झेडपी

मलाही दोन-तीन वेळा विचारलं. ‘तुमच्या मास्कने ऑक्सीजनची लेवल वाढतीया बरं का’ ! असा टोमणा मी मारला पण तो तिच्या लक्षात आला नाही. असे अनेक टोमणे तिच्या लक्षातच येत नाही. विनोद तर तिला अजिबात कळत नाही. पण भाव किती खाते! तिच्या नाकावर टिच्चून मी मेकअपचे बॉक्स वाटणार आहे. लॉकडाउनमुळे आपल्या सोसायटीतील महिलांना ब्युटी पार्लरमध्ये जाता येत नाही. त्यांना हे फायद्याचे ठरेल.’’ प्रज्ञाने म्हटले. मात्र खर्च वाचविण्याच्या दृष्टीने परेश म्हणाला,

‘अगं सोसायटीतील महिला सुंदर आहेत. त्यांना मेकअप बॉक्सची गरज नाही. मात्र, तुलाच दोन-तीन मेकअप बॉक्स घेऊन ठेव.’’ हा आपल्या दिसण्यावरील टोमणा ऐकून प्रज्ञाने परेशच्या खानदानाचा उद्धार केला. विविध प्राण्यांची नावे घेत, त्यांचेसारखे तुम्ही दिसता, असे म्हणत त्याच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. स्वयंपाकाचा गॅस बंद करून, ती बेडरूममध्ये पाय आपटत गेली. ‘

मी आठवडाभर स्वयंपाक करणार नाही. जेवणाची काय

सोय करायची ती करा.’ असे म्हणत तिने धाडकन दरवाजा लावून घेतला. आता मात्र परेशचे धाबे दणाणले. बायकोशी केलेला

एक किरकोळ विनोद त्याच्या अंगावर आला होता. काय करावे

तेच त्याला सुचेना. उपाशीपोटी तो ऑफिसला गेला. सगळा

दिवस त्याचा तणावात गेला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्याला फोन आला.

Panchnama
दहावी-बारावीच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तयारी सुरू

‘सॉरी. मी तुमच्याशी फार वाईट वागले. नाही नाही ते बोलले. मला माफ करा. मी तुमच्याशी परत कधीही असं वागणार नाही. मी तुमच्याशी कधीही भांडणार नाही. मला खूप पश्चात्ताप होतोय. इथून पुढे तुम्ही जे म्हणाल, अगदी तसंच मी वागेन. तुमचा शब्दही मी खाली पडून देणार नाही. प्लीज, मला मोठ्या मनाने एकदा माफ करा.’ असं म्हणून हुंदक्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

‘तुमच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. इथून पुढे मी तुम्हाला कधीही दुखावणार नाही, की कसला हट्ट धरणार नाही. वाटल्यास मी सगळे लेखी द्यायला तयार आहे. पण प्लीज मला माफ करा.’ रडण्याच्या आवाजाने परेशला भरून आलं. काय बोलावं तेच त्याला कळेना. कोणत्या तरी महिलेचा रॉंग नंबर होता. पण परेशला ते ऐकायला छान वाटत होतं. आपल्या स्वप्नातलं कोणीतरी बोलतंय, असंच त्याला वाटत होतं. त्यामुळे तो ‘रॉंग नंबर’ असे म्हणायचंच विसरून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com