नातळाच्या सुट्ट्य़ांमुळे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे : नाताळ आणि शनिवार-रविवारच्या सलग सुटटयांमुळे नागरिकांना कुटुंबासह पिकनिकला जाण्याची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे त्यात आज रविवार असल्याने सकाळपासून वाहनाच्या लांब रांगा लागल्या आहेत. 

पुण्याकडे येणारी वाहने अमृतांजन पुलाजवळ हळूहळू पुढे सरकत आहे. पहिल्या लेनवरून जाणारी अवजड वाहने बाजूला घेताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येत आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे वाहतूकीत पर्यटकांची झालेली वाढ आणि द्रुतगती मार्गावरील नेहमीची अवजड वाहतूक यांच्यातील समतोल राखण्यासाठी महामार्ग पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

Web Title: slow Moving traffic on the Expressway Due to Christmas