झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्राधिकरणाला अधिकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पिंपरी - आपल्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला दिले आहेत. तसे प्रमाणपत्र "एसआरए'चे प्रमुख डॉ. महेश झगडे यांनी नुकतेच प्राधिकरणाला पाठविले आहे. 

पिंपरी - आपल्या क्षेत्रातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला दिले आहेत. तसे प्रमाणपत्र "एसआरए'चे प्रमुख डॉ. महेश झगडे यांनी नुकतेच प्राधिकरणाला पाठविले आहे. 

""हे अधिकार मिळाल्याने प्राधिकरणाला आपल्या हद्दीतील सुमारे नऊ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करता येणार आहे. मात्र, त्यापूर्वी अघोषित असलेल्या झोपडपट्ट्या अधिकृत असल्याचा दाखला शासनाकडून प्राधिकरणाला मिळवावा लागेल. ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या विस्तारलेल्या आहेत त्या जागा ताब्यात घेऊन तेथे इमारती उभ्या करून त्यात झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन केले जाईल. उर्वरित जागेचा उपयोग अन्य कामासाठी करता येईल,'' असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सांगितले. 

सध्या प्राधिकरणाच्या हद्दीतील दुर्गानगर ही एकच झोपडपट्टी अधिकृत आहे. या ठिकाणी 285 झोपडीधारक वास्तव्यास आहेत. उर्वरित आठही झोपडपट्ट्या अनधिकृत असल्याने या सर्व झोपडपट्ट्या अधिकृत घोषित होईपर्यंत प्राधिकरणाला त्यांचे पुनर्वसन करता येणार नाही. त्या अधिकृत झाल्यानंतर प्राधिकरणाला आपल्या अभियंत्यांमार्फत हवा तसा आराखडा तयार करून त्यांचा पुनर्विकास करता येणार आहे. त्यासाठी "एसआरए'ची पुन्हा परवानगी लागणार नाही. अनधिकृत 1582 आणि अधिकृत (285) झोपडपट्ट्यांत मिळून 1867 झोपडपट्टीधारक आहेत. 

अनधिकृत झोपडपट्ट्या पुढीलप्रमाणे 
झोपडपट्टी झोपडीधारकांची संख्या 
1) भीमनगर, मोरे वस्ती, चिखली ----- 552 
2) अण्णा भाऊ साठेनगर, वाकड ----- 143 
4) खंडे वस्ती, भोसरी ------ 125 
5) शरदनगर, निगडी ------ 233 
6) सम्राटनगर, निगडी ------ 055 
7) राजनगर, निगडी ------ 365 
8) सिद्धार्थनगर, निगडी ------ 109 

Web Title: Slum redevelopment authority Authority