निमसाखर परीसरामध्ये चोरट्यांचा धुमाकुळ

राजकुमार थोरात
सोमवार, 11 जून 2018

वालचंदनगर : निमसाखर(ता.इंदापूर) परीसरामध्ये चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून विद्युत रोहित्रामधील 7 हजार 245 रुपयांच्या 34 किलो अॅल्युमिनिअमच्या तारा व 37 हजार रुपयांच्या शेळ्या व बोकड चोरुन नेल्याची घटना घडली. 

इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये अज्ञात चोरट्यांनी गेल्या दोन दिवसापासुन चोऱ्यांचा सपाटा लावला आहे. शनिवार (ता.9) ते रविवार (ता.10) च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी निमसाखर जवळील बोंद्रेवस्ती येथील विद्युत खांबावरुन विद्युत रोहित्र खाली फेकले. रोहित्र फोडून त्यातील 7 हजार 245 रुपयांच्या 34 किलो  अॅल्युमिनियमच्या तारांची चोरी केली.

तसेच 11 हजार रुपये किमतीचे 110 लिटर ऑईल ओतुन देवून महावितरणचे 18 हजार 245 रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी वालचंदनगरचे अभियंता अशोक सर्जेराव खामगळ यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

याच दरम्यान निमसाखर गावातील आनंदराव पांडुरंग रणवरे यांच्या ३० हजार रुपये किमतीच्या पाच शेळ्या व सात हजार रुपये किमतीचा एक बोकड चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी रणवरे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी सातव व मोहन फाळके तपास करीत आहेत.
 
Web Title: The Smack of thieves in Nimsakara area