चिमुकल्या अन्वीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हवा मदतीचा हात 

सुदाम बिडकर
शनिवार, 12 मे 2018

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील अन्वी गुरुनाथ फल्ले ही चार वर्षाची चिमुकली मेंदुच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. मेंदुवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला आता दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे.

रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या अन्वीच्या वडिलांनी पहिल्या शस्त्रक्रीयेसाठी नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडुन उसनवारी करुन पैसे जमवले होते परंतु आता दुसरी शस्त्रक्रीया पैशाअभावी लांबत चालली आहे. अन्वीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असुन दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.

येथील सर्वसामान्य फल्ले कुटुंबातील गुरुनाथ फल्ले यांच्या चार वर्षाची अन्वी आठ महिन्यांपुर्वी खेळत असताना तीला दम लागु लागला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्यानंतर तिच्या मेंदुला दोन गाठी असल्याचे निदान झाले आणि फल्ले कुटुंबाची पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली.

पुणे येथील केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर डॉक्टरांनी मेंदुवर तातडीने शस्त्रक्रीया करावी लागेल असे सांगितले गुरुनाथ फल्ले यांनी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याकडुन उसनवारी करुन पैसै जमा केले काही पैसे व्याजाने घेतले. ऑगस्ट 2017 मध्ये पहिली शस्त्रक्रीया करुन मेंदुवरील एक गाठ काढण्यात आली. त्यावेळी अन्वीची हृदयक्रीया काही क्षण बंद पडली होती. परंतु, डॉक्टरांनी शर्थीने प्रयत्न करुन ती पूर्ववत सुरु केली. त्यावेळी तिला 20 दिवस व्हेंटीलेटरवर ठेवले होते पहील्या शस्त्रक्रियेला एकुण सात लाख रुपये खर्च आला आता दुसरी गाठ काढण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

परंतु, पैशांअभावी शस्त्रक्रीया लांबत चालली आहे. गुरुनाथ फल्ले यांच्याकडे होते तेवढेही पैसे संपले ते आता पुन्हा मित्र व नातेवाईक यांच्याकडे मदतीसाठी फिरत आहे अन्वीच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असुन दानशुर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. मदतीसाठी बँक खाते क्रमांक
बैंक ऑफ महाराष्ट्र, शाखा मंचर
नाव- गुरुनाथ पुरोषोत्तम फल्ले
Account no. : 68020559877
IFSC code: MAHB0000112

Web Title: a small baby girl anvi wants economic help for brain surgery