मोदी सरकारचे आश्वासन विरले हवेत; व्यवसाय सुरू करण्यासाठी काय केले पाहा...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

-व्यवसाय सुरू करण्यासाठी आईच्या गळ्यातील सोने गहाण 
-पथारी व्यावसायिकाची हतबलता, केंद्राचे नुसतेच आश्‍वासन 

पुणे : गेल्या तीन महिन्यात जवळच सगळं संपलं...आता धंदा सुरू करायचा तर किमान वीस हजार रुपये लागतात..आता थांबू शकत नाही. पोरांचे शिक्षण, आईचा आणि माझा औषधांचा खर्च असे अनेक प्रश्‍न आहेत. शेवटी निर्णय घेऊन आईच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले आहेत. उद्यापासून कोणीही विरोध केला तरी ऐकणार नाही.. माझी गाडी मी लावणारच. पुलाची वाडीतील पंचावन्न वर्षांचा सुनील भादेकर सांगत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, आई, दोन मुले आणि पत्नी असे कुटुंब आहे. गेल्या 17 ते 18 वर्षांपासून भादेकर जंगली महाराज रस्त्यावर ज्यूसची गाडी लावतात. पूर्वी त्याच जागी आई केळीची गाडी लावत होती. तिचे वय आता 72 आहे. तिच्या परवान्यावर भादेकर ज्यूसची गाडी लावतात. पुन्हा गाडी सुरू करावयाची तर वीस हजार रुपये लागतात. पथारी संघटनेच्या लोकांनी येऊन दोन हजार रुपयांची मदत केली. परंतु त्याने काय होणार. शेवटी आईच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवून सोळा हजार रुपये उभे केले आहेत. त्यातून उद्यापासून व्यवसायाला सुरवात करणार आहे, भादेकर सांगत होते. 

भादेकर सारख्या अनेक पथारी व्यावसायिकांपुढे पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण आहे. केंद्र सरकारने पथारी व्यावसायिकांना दहा हजार रुपये भांडवल देण्याची घोषणा केली. परंतु अद्याप ते मिळालेले नाहीत.

Video : केरळच्या `त्या` हत्तीणीला पुण्याच्या `या` हरिणीचा वाटत असेल हेवा....

त्यावर भादेकर म्हणतात, " साहेब कोणी कोणाचे नसते. जो तो भेटतो, तो केवळ आश्‍वासन देतो. व्यवसाय सुरू केला नाही, तर पोरांच्या शिक्षणाचे काय करणार. त्यांना शिकवले पाहिजे. उद्या त्यांच्यावर अशी वेळ येता कामा नये.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Small businessmen criticize Modi government