स्मार्ट सिटीसाठी २०७ कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राज्य व केंद्र सरकारकडून २०७ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता महापालिकेला प्राप्त झाला आहे. यापूर्वी महापालिकेला दोन हप्त्यांत मिळून केवळ ८४ कोटी रुपये प्राप्त झाले होते. त्याअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत कामे सुरू आहेत. 

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत शहराचा समावेश झाल्यानंतर पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंट या दोन उद्देशानुसार महापालिकेने काम सुरू केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबविण्यासाठी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर व वाकडच्या काही भागाचा समावेश केला आहे. संपूर्ण प्रकल्प एक हजार कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी दरवर्षी शंभर कोटी रुपयांचा निधी सरकारकडून मिळणार आहे. आतापर्यंत ८४ कोटी रुपयांचा निधी शहराला मिळाला होता. आता तब्बल २०७ कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मिळालेला निधी २९१ कोटी रुपये झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत होणाऱ्या कामांना गती मिळणार आहे. 

अशी होतील कामे
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सुमारे २५० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या कामांना आता मिळालेल्या निधीमुळे गती मिळणार आहे. स्मार्ट सिटीत होणाऱ्या कामांमध्ये फायबर ऑप्टिक केबल टाकणे, त्यासाठी डक्‍ट तयार करणे, पथदिव्यांसाठी स्मार्ट खांब उभे करणे, वायफाय यंत्रणा उभारणे अशा गोष्टींचा समावेश असेल.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सरकारकडून २०७ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे. त्यामुळे कामांना गती दिली जाणार आहे. योजनेतील विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
- नीळकंठ पोमण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

Web Title: Smart City 207 Crore Fund