स्मार्ट सिटी रस्ते बनवते अन् महापालिका...

road1.jpg
road1.jpg

बालेवाडी (पुणे) : बाणेर -बालेवाडी येथे पुणे स्मार्ट सिटीकडून बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे. काही भागातील रस्त्याची कामे बर्‍यापैकी उरकली आहेत. पण जेथे रस्त्यांची कामे झाली आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुन्हा रस्ता खोदला जातो आणि त्यांचे काय काम राहिले असेल ते केले जाते. त्यामुळे स्मार्ट रस्ता हा स्मार्ट राहत नाही. कामासाठीच्या निधीचा ही अपव्यय होतो.  हे सगळं होतंय ते फक्त या दोन्ही विभागात समन्वयाचा अभाव असल्याने. बाणेर -बालेवाडी येथे स्मार्ट सिटीकडून रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर 
पुणे महापालिकेकडून 24×7 समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू आहे.

यामध्ये महापालिका व स्मार्ट  सिटी या दोघांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि तो नसल्यामुळे, नव्याने बनवलेले रस्ते खोदले जातात व ते परत केले जातात. पण या कामात पूर्वी इतका सफाईदारपणे नसतो,  त्यामुळे त्याठिकाणी तो रस्ता स्मार्ट राहत नाही. ही जी    कामे  केली जातात ती  जनतेच्या पैशातूनच. डबल कामामुळे जनतेचा पैसा आणि प्रशासनाचा वेळ वाया जातो. आधीच लॉकडाऊनमुळे सगळीच कामे रखडली आहेत. पाऊस सुरु होण्यापूर्वी ही कामे  करणे गरजेचे आहे, पण तसे न होता  तयार झालेला रस्ता खोदला जातो. यात जनतेच्या पैशाचा अपव्यय होतो.

 

ज्यावेळी एखाद्या रस्त्याचे काम सुरू होते. त्यापूर्वीच महापालिकेला आणि पाणीपुरवठा विभागाला याबाबत कळवले जाते, पण पाणी पुरवठा विभागाकडून कामात तत्परता दाखवली  जात नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची कामे अशी थांबवता येत नाहीत, आणि मग रस्ता बनवून झाल्यानंतर पुन्हा खोदाई करून त्यांची राहिलेली कामे केली जातात त्यामुळे रस्त्याची काम प्रलंबित राहतात.  

अरुण गोडबोले, उपअभियंता, पुणे स्मार्ट सिटी.

 

ज्यावेळी स्मार्ट सिटी कडून एखादा रस्ता बनवण्याचे प्रयोजन असते. त्यावेळी दोन्ही विभागाच्या अधिकार्‍यांची एकत्रित पाहणी व्हिजिट त्या त्या भागांमध्ये केली जाते. कुठे जलवाहिनी आहे. कुठे पाणी सोडण्याचा व्हॅाल्व्ह ठेवलेला आहे हे सांगितले जाते?  तरी या ठिकाणी स्मार्ट सिटी कडून रस्त्याची कामे पूर्ण केली जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा व्हॅाल्व्ह दिसतो आहे तिथे चेंबर ठेवणे गरजेचे आहे पण तिथे तसे न केल्यामुळे आम्हाला त्या भागात काही काम असल्यास खोदाई करणे भाग पडते.

 श्रीधर कामत, कार्यकारी अभियंता,  पाणीपुरवठा विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com