स्मार्ट सिटीसाठी पार्किंग पॉलिसी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पिंपरी - शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या विचारात घेऊन पार्किंग धोरणही ठरवावे लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर युरोपातील शहरांसह देशातील मुंबई, रांची, बंगळूर, चेन्नई, नागपूर, पुणे या शहरांचा अभ्यास करून महापालिकेने पिंपरी-चिंचवडसाठी पार्किंग धोरण आखले आहे. त्याचे सादरीकरण दोन दिवसांपूर्वी महापालिका भवनात सहशहर अभियंता राजन पाटील यांनी केले होते. हे धोरण मान्य करण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर बुधवारी (ता. २०) प्रशासनाकडून मांडले जाण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी - शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. त्यासाठी वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या विचारात घेऊन पार्किंग धोरणही ठरवावे लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर युरोपातील शहरांसह देशातील मुंबई, रांची, बंगळूर, चेन्नई, नागपूर, पुणे या शहरांचा अभ्यास करून महापालिकेने पिंपरी-चिंचवडसाठी पार्किंग धोरण आखले आहे. त्याचे सादरीकरण दोन दिवसांपूर्वी महापालिका भवनात सहशहर अभियंता राजन पाटील यांनी केले होते. हे धोरण मान्य करण्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेसमोर बुधवारी (ता. २०) प्रशासनाकडून मांडले जाण्याची शक्‍यता आहे. शहरासाठी निश्‍चित केलेले पार्किंगचे दर अन्य शहरांच्या तुलनेने कमी राहणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मतानुसार, लोकसंख्या १० लाखांवर आणि वाहनांची संख्या पाच लाखांवर गेल्यानंतर शहरासाठी स्वतंत्र पार्किंग धोरण ठरविणे गरजेचे आहे. आपल्या शहराची लोकसंख्या २२ लाखांवर आणि वाहनांची संख्या १६ लाखांवर गेलेली आहे. त्यामुळे पार्किंग धोरण ठरविले आहे. सध्या शहरात कुठेही आणि कशीही वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. वाहन पार्क करण्यासाठी जागा शोधताना किमान एक मिनिटांचा मानसिक त्रास वाहनचालकाला सहन करावा लागत आहे. त्या काळात ते वाहन सुरू राहात असल्यामुळे किमान ३० ग्रॅम कार्बन डायऑक्‍साईड ऊत्सर्जित करते, त्यामुळे पार्किंग धोरण आवश्‍यक आहे. त्यासाठी वर्दळीच्या दृष्टीने आवश्‍यकतेनुसार चार झोन केलेले असून पार्किंग शुल्क वाहनाच्या स्वरुपानुसार वेगवेगळे नमूद केलेले आहे. रात्रीच्या दीर्घकाळ पार्किंगसाठीही वेगळे शुल्क असेल.

सध्या शहरातील गावठाणे व झोपडपट्टीतील रस्ते पार्किंग धोरणातून वगळलेले असून आवश्‍यकतेनुसार त्यात बदल करण्याचे नियोजन आहे. सायकल, रुग्णवाहिका व मान्यताप्राप्त रिक्षा थांबे पार्किंग धोरणातून वगळले आहेत. दर दोन वर्षांनी या धोरणाचा आढावा घेण्यात येणार आहे. शहराच्या विकास आराखड्यात पार्किंगसाठी ८९ आरक्षणे असून २१ आरक्षणे ताब्यात आलेली आहेत. त्यांचे क्षेत्र ८.८३ हेक्‍टर आहे. उर्वरित आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पार्किंग धोरणासाठी निश्‍चित रस्ते
शहरातील निगडी-दापोडी, नाशिक फाटा ते वाकड, सांगवी-रावेत, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हे बीआरटी मार्ग, पिंपरी कॅम्पातील सर्व रस्ते, भोसरीगाव, नाशिक फाटा परिसर, संपूर्ण देहू ते आळंदी रस्ता, संपूर्ण प्राधिकरण, भूमकर चौक-वाकड ते रावेत आणि दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या रेल्वे स्थानकांचा परिसर.

Web Title: smart city parking policy