‘स्मार्ट सिटीसाठी हातभार लावावा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे - पुणे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच, महापालिकेच्या बरोबर या संस्थांनी पुण्याच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले. लायन्स क्‍लब ऑफ पुणे गणेशखिंडतर्फे महिलांसाठी ई-टॉयलेट बसविण्यात आले, त्याच्या उद्‌घाटनावेळी त्या बोलत होत्या.

लायन्स क्‍लबकडून दहा ई-टॉयलेट शहरातील वेगवेगळ्या भागांत बसविण्यात येणार आहेत. महापालिकेने अर्थसाह्य केले तर आणखी दहा ई-टॉयलेट शहरात बसवण्यात येतील, अशी ग्वाही लायन्स क्‍लबचे विजय भंडारी यांनी दिली. लायन्स क्‍लबचे प्रांतपाल रमेश शहा, प्रेमचंद बाफना, प्रवीण चोरबोले, शोभा धारिवाल आदी उपस्थित होते.

Web Title: smart city pune municipal mukta tilak