स्मार्ट सिटी, सायलेन्स सिटी...

स्मार्ट सिटी, सायलेन्स सिटी...

पुणे - ‘नो हॉर्न डे’निमित्त वाहतूक पोलिस, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शहर व उपनगरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या निमित्त  विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन वाहनचालकांमध्ये जनजागृती केली.

हडपसरमध्ये उपक्रम
हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने  हॉर्न न वाजवण्याबाबत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात 
आली.

हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक जे. डी. कळसकर, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. बाळासाहेब देवकाते, डॉ. श्‍याम मिसाळ, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. म्हेत्रे यांच्या मागदर्शनखाली या अभियानाचे आयोजन केले होते. सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. म्हेत्रे, राजू ननावरे, तेजस भोसले, सुनील बोरकर, दिनेश टपके आदी उपस्थित होते.

धनकवडीत जनजागृती
कात्रज : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी विनाकारण हॉर्न वाजवण्याची सवय बंद व्हावी, यासाठी धनकवडीतील बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नायडू, वाहतूक पोलिस अश्‍चिनी जौंजाळ आणि वाघ यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. बालाजीनगर उड्डाण पूल परिसरात या वेळी प्रबोधनपर पत्रके वाटप करण्यात आली.

पोलिसच रस्त्यावर
वडगाव शेरी : लोहगाव विमानतळ येथे पोलिसांनी जनजागृती केली. या वेळी ‘नो हॉर्न’चे आवाहन करणारे स्टिकर वाहनांवर लावण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (लोहगाव विमानतळ) अजय कुमार व त्यांचे कर्मचारी; तसेच सहायक पोलिस आयुक्त देविदास पाटील, पोलिस निरीक्षक विमानतळ वाहतूक विभाग जितेंद्र कोळी, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, भगवान कांबळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून पथनाट्य
औंध- मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात वाहनचालकांचे पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. या वेळी चतुःशुंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश मासाळकर, उपनिरीक्षक संगम परगेवार, प्राध्यापिका मंजूषा कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी पाषाण, बाणेर रस्ता, औंध यामार्गे शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांना हॉर्न न वाजवण्याबद्दल आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com