स्मार्ट सिटीचे  ‘स्मार्ट’ नियोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्त्वावर सायकल शेअरिंग योजना सुरू केली आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) व निगडी- प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारणे, प्रायोगिक तत्त्वावर सहा शाळांमध्ये ई-क्‍लासरूम सुरू करणे, रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणे व पॅन सिटीअंतर्गत फायबर ऑप्टिकल केबल टाकणे, या माध्यमातून शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू झाली आहे. सद्य:स्थितीचा विचार करून भविष्यातील नियोजनासाठी महापालिकेने शहर परिवर्तनाचा मार्गही अवलंबिला आहे. 

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत महापालिकेने शहर परिवर्तन कार्यालय सुरू केले आहे. त्या माध्यमातून शहराच्या सद्य:स्थितीचा अभ्यास करून भविष्यातील नियोजनासाठी उपाययोजना सुचविल्या जात आहेत. त्यासाठी शहर परिवर्तन कार्यालयाने सध्याचे नोकरी- व्यवसायासाठी आणि भविष्यात राहण्यायोग्य उत्तम शहर बनविण्याचे नियोजन सुरू आहे. कारण, राहण्यायोग्य शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडचा देशात ६९ व्या क्रमांकावर आहे. त्यात सुधारणा करून पहिल्या ‘टॉप टेन सिटी’मध्ये शहराचा क्रमांक येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वांगीण विकास करणे, विकास धोरणात नागरिकाचा सक्रिय समावेश करणे, आवश्‍यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे व पर्यावरणपूरक ओळख निर्माण करणे, असे परिवर्तनाचे चार मार्ग आखून त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

प्रकल्पातील सुविधा 
 सायकल शेअरिंग प्रकल्प शहराच्या सर्व भागांत राबविण्यासाठी सर्वेक्षण करणार 
 सोलर सिस्टिम प्रकल्प शहराच्या विविध भागांमध्ये राबविण्याचे नियोजन 
 पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, चिखली येथील सहा शाळांमध्ये ई-क्‍लासरूम उभारणार. त्यात डिजिटल व कॉम्प्युटर लॅब, ई-लर्निंग साहित्य असेल 
 दोन इमारतींवर ‘रूफ टॉप सोलर’ प्रकल्प उभारणार 
 पॅन सिटीअंतर्गत फायबर ऑप्टिकल केबलसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार 
 कनेक्‍टेड स्ट्रीट प्रकल्पासाठी तीन निविदा प्राप्त

स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथे प्रायोगिक तत्त्वावर सायकल शेअरिंग योजना सुरू केली आहे. वायसीएम रुग्णालय व निगडी जलशुद्धीकरण केंद्र येथे सोलर सिस्टिम बसविण्याचे नियोजन आहे. आणखी काही योजना राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. 
- निळकंठ पोमण, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका

Web Title: Smart City's Smart Planning