शेत नांगरण्यासाठी ‘स्मार्ट फाळ’

शेत नांगरण्यासाठी ‘स्मार्ट फाळ’

पुणे - शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही शेत नांगरण्यासाठी वापरत असलेल्या नांगराचा फाळ आता ‘स्मार्ट’ झाला आहे. त्यामुळे हा ‘स्मार्ट फाळ’ फक्त तुमची शेतजमीन नांगरणार नाही, तर तो तुम्हाला जमिनीच्या पोतासह इतर माहितीही सांगेल. 

आधुनिक काळात तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. एका क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर दुसऱ्या क्षेत्रात यशस्वीपणे करण्याचे अनेक प्रयोग होत आहेत. आता वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात करून त्याचा फायदा बळिराजाला मिळवून देण्याचा अभिनव प्रयोग ‘ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एआरएआय) केला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात याचा पथदर्शी प्रयोग सुरू आहे. या प्रयोगाचे निष्कर्षही चांगले आहेत. 

याबाबत ‘एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ म्हणाले, ‘‘शेत नांगरण्यासाठी जमिनीत फाळ घालून नांगरणे, ही परंपरागत शेती शेतकरी करत आहे. आता तंत्रज्ञानामुळे यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाबरोबर ‘स्मार्ट फाळ’चा प्रयोग सुरू आहे. हा फाळ नांगरण्यासाठी जमिनीत जातो, त्या वेळी तेथील तापमान किती आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्याला देईल. याचबरोबर शेत नांगण्यासाठी फाळ किती आत घालायचा तेही शेतकऱ्याला सहजतेने कळेल. तसेच, जमिनीच्या पोतासह इतर इत्थंभूत माहिती शेतकऱ्याला मिळेल.’’

तंत्रज्ञान हे प्रवाही असते. त्यामुळे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात ते वापरता येते. अवकाशातील तंत्रज्ञानाचा वाहन उद्योगात वापरण्याचे प्रयोग जसे सुरू आहेत तसेच, वाहन उद्योगातील तंत्रज्ञानही कृषीसारख्या क्षेत्रामध्ये वापरण्याचे संशोधन होत आहे. 
- रश्‍मी उर्ध्वरेषे, संचालक, एआरएआय  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com