स्मार्ट शेतीसाठी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

पुणे - शेतीपुढील आरिष्ट्ये, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास व शेतीसह गटशेतीचे तंत्र त्यातून शेती उत्पादक कंपन्यांची स्थापना यांची विषयांची माहिती तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून सोमवारी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात करण्यात आले.

पुणे - शेतीपुढील आरिष्ट्ये, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास व शेतीसह गटशेतीचे तंत्र त्यातून शेती उत्पादक कंपन्यांची स्थापना यांची विषयांची माहिती तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून सोमवारी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात करण्यात आले.

गटशेती चळवळ ही काळाची गरज असून सहकार शेतीला कॉर्पोरेटची जोड दिली, तर गटशेती नफ्यात येईल. संशोधन, नवतंत्रज्ञान व कौशल्य प्रशिक्षणातून आर्थिक उत्पन्न व रोजगारनिर्मिती होईल.
- संभाजी निलंगेकर, राज्याचे कौशल्य विकास मंत्री.

शेतीकडे नफा देणारा व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. गटशेतीसाठीच्या कौशल्य प्रशिक्षणातून 2022 पर्यंत केवळ उत्पन्न नव्हे, तर नफादेखील दुप्पट करण्याचे ध्येय्य प्रत्यक्षात उतरेल. शेती उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी थेट ग्राहकांपर्यंत पोचल्यास नफा शेतकऱ्यांना मिळेल.
- श्‍वेता शालिनी, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन.

अल्प भूधारणेमुळे शेती संकटात सापडली आहे. गटशेतीशिवाय पर्याय नाही. कौशल्य प्रशिक्षणातून गटशेती, शेती उत्पादक कंपन्या आणि मूल्यवर्धक साखळ्यांच्या माध्यमातून शाश्‍वत शेती होईल.
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ.

'पीकनिहाय शेती उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या पाहिजेत. त्या माध्यमातून पीककर्ज, गुंतवणूक आणि साठवणपूर्व वित्तपुरवठा होऊ शकेल. मूल्यसाखळ्यांमध्ये बॅंकर्स, ट्रेडर्स, मार्केटिंग यांना जोडल्यास शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध होईल. ''
- डॉ. सुधीरकुमार गोयल, माजी अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी विभाग.

'सहकारी संस्था लाखांच्या घरात असल्या तरी त्या राजकारण आणि भ्रष्टाचारात अडकल्या. वैयक्तिक शेतीमध्ये मर्यादा असल्यामुळे गटशेती ही काळाची गरज आहे. समस्या व अडचणींमध्येच संधी जन्माला येते.''
- विलास शिंदे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी.

'शेतमालाचे आक्रमक मार्केटिंग केले तर बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतमाल पिकविल्यानंतर ग्राहक मिळवून तो टिकवणे गटशेतीमुळे शक्‍य होईल.''
- प्रदीप लोखंडे, संचालक, रूरल रिलेशन्स.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Farming Krushiculture Dnyansohala Guidance