मुलींच्या मदतीला ‘स्मार्ट गर्ल +’

Smart-Girl-+-App
Smart-Girl-+-App

पुणे - जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन व महाविद्यालयीन युवतींच्या मदतीसाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘स्मार्ट गर्ल +’ हे स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी रविवारी (ता. २६) हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. 

हे ॲप सर्वांना मोफत डाउनलोड करता येणार आहे. असे ॲप तयार करणारी पुणे ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. मुली व महिलांना या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती, मासिक पाळी, आहार त्याचबरोबर करिअरबाबतची संपूर्ण माहिती आता शाळा, कॉलेज किंवा घरबसल्या त्यांच्या मोबाईलवर मोफत मिळू शकणार आहे. 

हे ॲप डाउनलोड करण्यासाठी मोबाईलमधील प्ले स्टोअरमध्ये जावे. तेथे स्पेस न देता ‘स्मार्ट गर्ल +’ असे टाईप करावे आणि डाउनलोड करावे.

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने संयुक्तपणे हे ॲप तयार करण्यात आले आहे.      

ॲपचा यांना फायदा!
सध्या पुणे जिल्ह्यात तीन हजार ३१७ प्राथमिक शाळा, सुमारे दीड हजार माध्यमिक शाळा, शंभरहून अधिक कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या सर्व शिक्षण संस्थांमध्ये सुमारे दहा लाखांच्या आसपास मुली आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५३९ उपकेंद्रांत मिळून साडेबाराशे परिचारिका, तेवढ्याच आशा स्वयंसेविका, साडेचार हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि साडेपाच हजारांच्या आसपास प्राथमिक शिक्षिका कार्यरत आहेत. या सर्वांना हे ॲप डाउनलोड करून घेता येणार आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे हे ॲप महिलांसाठी खूपच उपयुक्त ठरणारे आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक महिला आणि मुलींनी ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे.
- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com