अबोल भिंती झाल्या बोलक्‍या

मिलिंद संधान
सोमवार, 21 मे 2018

नवी सांगवी - रंग उडलेल्या, खराब झालेल्या भिंती, आपल्याला सामाजिक संदेश देऊ लागल्या तर? नव्हे, तर पिंपळे सौदागर येथील जिंजर सोसायटीतील अनघा पाटील या बावीस वर्षीय तरुणीने ‘स्मार्ट सोसायटी’ या उपक्रमातून ‘बोलक्‍या भिंती’ ही संकल्पना राबविली आहे. त्यातून सोसायटीच्या सौंदर्यात भर पडतानाच निरामय आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि वाचन संस्कृतीचे संदेश दिले जात आहेत. 

ही संकल्पना राबविण्यासाठी अनघाने कुंपणाच्या खराब झालेल्या भिंती सर्वप्रथम पॉलिश पेपरने घासून स्वच्छ केल्या. नंतर त्यावर पांढरा रंग लावला. रंग सुकल्यानंतर त्यावर लहान मुलांच्या साहाय्याने सायकल चालविणारी, वाचन करणारी मुले, पाणी वाचवा, प्लास्टिक बंदीचे समर्थन करणारी चित्र रंगविली. या कामात सर्वांना सहभागी करून घेतल्याने तिला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. काळ्याकुट्ट पडलेल्या भिंती कधी नव्हे, ते रंगीबेरंगी चित्रांमुळे खुलून दिसू लागल्या. येणाऱ्या-जाणाऱ्यांशी बोलूही लागल्या. साहजिकच सोसायटीला नवीन चेहराही मिळाला. 

लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असलेल्या अनघाने बारावीनंतर वास्तुकला या विषयात पदवी घेतली आहे. त्यातूनच तिने ही संकल्पना राबविली आहे.

सोसायटीचे सचिव शंतनू प्रभुणेंजवळ मी ‘बोलक्‍या भिंती’ची संकल्पना मांडली. त्यांनी लगेचच होकार दिला. संगणक अभियंता अक्षत निंबाळकर यांनाही चित्रकलेचे ज्ञान अवगत असल्याने त्यांचीही खूप मदत मिळाली. पुढील टप्प्यात रस्ता सुरक्षा, मुलगी वाचवा, असे संदेश देणारी चित्रे रेखाटणार आहोत. इतर सोसायट्यांमध्येही हा उपक्रम राबविला जाईल. 
- अनघा पाटील

Web Title: smart society wall painting