स्मार्ट घड्याळे खरेदीचा विषय तहकूब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पिंपरी - महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी अधिकारी, सफाई कर्मचारी आणि स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगारांसाठी स्मार्ट घड्याळे खरेदी करण्याचा विषय स्थायी समिती सभेने तहकूब ठेवला. याबाबतची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. 

पिंपरी - महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी अधिकारी, सफाई कर्मचारी आणि स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगारांसाठी स्मार्ट घड्याळे खरेदी करण्याचा विषय स्थायी समिती सभेने तहकूब ठेवला. याबाबतची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. 

सहायक आरोग्य अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य मुकादम, सफाई कर्मचारी, घंटागाडी ठेकेदार, स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगार यांच्यासाठी चार हजार ५४४ स्मार्ट घड्याळे खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर होता. संबंधित घड्याळे बंगळूर येथील आयटीआय कंपनीकडून थेट पद्धतीने प्रथमतः चार वर्षांसाठी प्रत्येक नगासाठी दरमहा २८७ रुपये अधिक जीएसटी या दराने उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी एक वर्षासाठी एक कोटी ५६ लाख ४९ हजार ५३६ म्हणजेच चार वर्षांसाठी सहा कोटी २५ लाख ९८ हजार १४४ अधिक जीएसटी, असा खर्च अपेक्षित आहे. 

थेट पद्धतीने स्मार्ट घड्याळे खरेदीची प्रक्रिया व त्याच्या प्रस्तावाची सविस्तर माहिती स्थायीच्या सदस्यांनी केली. त्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले, की ‘‘आयटीआय ही कंपनी केंद्र सरकारची मान्यताप्राप्त संस्था आहे. त्यांनी नागपूर, इंदूर, लखनौ, नवी मुंबई, गाझियाबाद या महापालिकांमध्ये स्मार्ट घड्याळे पुरविली आहेत. महापालिका कायद्यानुसार घड्याळे खरेदीचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला आहे. घड्याळांची खरेदीची रक्कम दरमहा चार वर्षांपर्यंत द्यायची आहे. घड्याळांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंपनीची आहे.’

घड्याळांचा उपयोग 
आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकारी, स्वच्छता कर्मचारी, ठेकेदाराकडील मजूर यांनी किती तास काम केले, किती वेळ तो बाहेर होता, त्यांच्या कामाच्या तासांचा पूर्ण उपयोग होतो की, नाही आदीबाबतची माहिती अधिकाऱ्यांना कळणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Smart Watch Purchasing Issue