अपंगांसाठी स्मार्ट व्हीलचेअर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मंचर - अपंग किंवा हालचाल न करता येणाऱ्या अर्धांगवायूच्या व्यक्तींना इतरांची मदत न घेता, कुठेही जाता येत नाही. अशा व्यक्तींचे आयुष्य स्वावलंबी व्हावे. त्यांना आनंदी जीवन जगता यावे. म्हणून मंचर येथील अभियांत्रिकी विद्यार्थी जिग्नेश ललित राठोड व निनाद प्रमोद निजामपूरकर (पुणे) या दोघांनी व्हीलचेअरचे नियंत्रण करू शकेल, असे स्मार्ट व्हीलचेअर मोबाईल ॲप विकसित केले आहे. 

आनंदराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चचे प्रा. अनिल लोहार (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप विकसित केले आहे. अपंग व्यक्तीसाठी असणारी व्हीलचेअर दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊन ढकलावी लागते. मात्र, आता या ॲपद्वारे व्यक्ती स्वतः कमांड देऊन स्मार्ट चेअर नियंत्रित करेल. यामध्ये जी व्यक्ती हातापायांची हालचाल करू शकत नाही, बोलू शकत नाही, ती तोंडाद्वारे (आवाजाने) कमांड देईल. मायक्रोप्रोसेसर ती कमांड प्रोसेस करेल.

समजा एखादी व्यक्ती मूकबधिर असेल व चालताही येत नाही, ती ‘टच’ करून कमांड देऊ शकते. एखाद्या व्यक्तीला टच करण्यासाठी बोटे काम करत नसतील, तर एक्‍लोमीटरने तो कमांड देऊ शकतो. यामध्ये मोबाईल वर-खाली किंवा उभा-आडवा केला तरी चेअर मागे किंवा पुढे होऊ शकते. युद्धामध्ये अपंगत्व आलेल्या सैनिकांना ही स्मार्ट व्हीलचेअर उपयुक्त ठरणार आहे.

असे काम करेल ॲप
या ॲपसाठी रोबोटिक्‍स या हार्डवेअरमध्ये चिप बसवली आहे. त्यामधील सॉफ्टवेअर या हार्डवेअरला जोडले आहे. हे ॲप बनवण्यास ६ महिन्यांचा अवधी लागला. ही चिप कोणत्याही व्हीलचेअरला बसवून ब्लू टूथने कनेक्‍ट करावी. कनेक्‍ट केल्यानंतर चेअरला एक मायक्रोप्रोसेसर देण्यात आला आहे. त्यानंतर व्यक्ती जशी कमांड देईल, त्याप्रमाणे मायक्रोप्रोसेसर स्वीकारेल आणि चेअरची हालचाल होईल.

Web Title: smart wheelchair for handicapped