‘थिंग विल बी ओके’ अन्‌ ‘फ्लोरिअन’ची बाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - आरोग्य सेनेने आयोजित केलेल्या पाचव्या स्मिता पाटील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ऑस्ट्रियाच्या ‘थिंग विल बी ओके’ (लघुपट विभाग) आणि क्रोएशियाच्या ‘फ्लोरिअन’ने (माहितीपट विभाग) बाजी मारली आहे. लघुपट विभागात धीरज जिंदाल आणि माहितीपट विभागात डॉरिओ बुकोवस्की यांनी ‘उत्कृष्ट दिग्दर्शक’चे पारितोषिक पटकावले आहे.

पारितोषिक वितरण ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते झाले. या वेळी आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य, योगेश जगम, प्रा. प्रमोद दळवी, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर, वर्षा गुप्ते आणि डॉ. गीतांजली वैद्य आदी उपस्थित होते.

रशियाच्या ‘द रिटन ऑफ इरिक’ (लघुपट विभाग) आणि कोलकता येथील ‘आय. एम. बोनी’ (माहितीपट विभाग) द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्लेग्राउंड (बंगलोर), लिचेस (बंगलोर), ९३ नॉट आउट (तमिळनाडू), मोह दिया तांढा (मुंबई) आणि होल्डिंग बॅग (मुंबई) या लघुपटांना परीक्षकांच्या पसंतीचे पारितोषिक मिळाले. 

द एंड ऑफ द रोड (पेरू) या माहितीपटासह पुण्यातील राजू द लाइफ सेव्हर, द लॅंड ऑफ सिगिंग बर्ड आणि माई ही तीन माहितीपट परीक्षकांच्या पसंतीस उतरली. या महोत्सवात २५० चित्रपट सादर करण्यात आले. त्यात १५० भारतीय आणि शंभर परदेशी चित्रपट होते. ६२ चित्रपट अंतिम परीक्षणासाठी निवडण्यात आले होते. त्याचे परीक्षण अशोक राणे व गगनबिहारी बोराटे यांनी केले. या कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ हा निकिता मोघे यांचा कार्यक्रम झाला.

डॉ. वैद्य म्हणाले, ‘‘हा महोत्सव मानवी भावनांचा कॅलिडोस्कोप आहे. लघुपट व माहितीपटाच्या बाबतीत आपण मागे आहोत. अशा महोत्सवाच्या माध्यमातून देशपरदेशातील उत्कृष्ट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतात.’’

मनाचे वाळवंट होत असताना अशा चित्रपट महोत्सवाची खरी गरज आहे आणि याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- भाई वैद्य, ज्येष्ठ समाजवादी नेते

Web Title: Smita Patil Mahotsav