दुबईतुन आलेल्या प्रवाशाकडून बुटातून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी

सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर विभागाकडुन सुमारे 35 लाखाचे 705 ग्रॅम सोने जप्त
Gold Smuggling
Gold SmugglingEsakal

पुणे : दुबईतून विमानाने आलेल्या प्रवाशाने बूटातुन सोन्याच्या बिस्किटांची तस्करी केल्याचा प्रकार 7 फेब्रूवारीला उघडकीस आला. सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर विभागाच्या पथकाकडून सुमारे 35 लाख रुपये किंमतीची 705 ग्रॅम सोने जप्त केले.

संबंधित प्रवासी दुबई ते अहमदाबाद आणि तेथून त्याच विमानाने पुण्यात आला होता. पथकाकडुन प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी वेळी हा प्रकार उघडकीस आला. प्रवाशाने त्याच्या बूटाच्याखालील भागात बिस्किटे गुंडाळून त्यावर चिकटपट्टी चिकटवली होती. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे सीमाशुल्क विभागाने विभागाने डिसेंबर महिन्यात चेन्नई ते मुंबई या मार्गावरील विमानाने प्रवास करणार्‍या एका प्रवाशाकडून 24 कॅरेटचे तब्बल 800 ग्रॅम वजनाचा आणि 40 लाख 36 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा ऐवज जप्त करून एका प्रवाशाला अटक केली होती. त्यामध्ये सहा सोनसाखळ्या एका ब्रेसलेटचा समावेश होता. तर 8 फेब्रुवारी रोजी कस्टम विभागाने पुणे विमानतळावरून शारजाह ला जाणार्‍या प्रवाशाकडून सहा लाखांचे विदेशी चलन जप्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com