तीन दिवसांनंतर नागाला जीवदान

पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर) - शेतातील बिळात अडकलेला नाग.
पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर) - शेतातील बिळात अडकलेला नाग.

जुन्नर - पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर) येथील शेतकरी खंडू मारुती पानसरे यांच्या शेतातील बिळात अडकलेल्या दुर्मीळ नागाची तीन दिवसांनी सुटका झाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. 

तीन दिवसांपूर्वी पानसरे यांच्या शेतात कांदा लागवडीचे काम सुरू होते. कांद्याची लागवड झालेल्या एका वाफ्यात हा नाग चिखलात रुतून बसला असल्याचे पानसरे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या मुलास ही बाब सांगितली. तो शुक्रवारी गावी आला असता त्याला सापाची आठवण झाल्याने तो कांद्याच्या शेतात गेला. 

या वेळी त्या ठिकाणी अडकलेला साप दिसून आला. त्याने जुन्नर वनविभागातील वनरक्षक रमेश खरमाळे यांच्याशी संपर्क साधला. रमेश व प्रवीण खरमाळे त्या ठिकाणी पोचले. सापाला बिळातून काढण्यासाठी खोदकाम करणे गरजेचे होते. आकाश परदेशी या सर्पमित्राला त्यांनी मदतीसाठी बोलावून घेतले. या दोघांनी कोब्रा प्रजातीच्या सुमारे पाच फूट लांबीच्या नागास बाहेर काढल्याने दुर्मीळ होत चाललेल्या कोब्रा या प्रजातीच्या नागास जीवदान मिळाले. या नागास त्यांनी त्याच्या अधिवासात सोडून दिले. पिंपळगाव सिद्धनाथ येथील ग्रामस्थ प्रवीण खरमाळे, मच्छिंद्र पानसरे, दिनकर नायकोडी, किरण खंडागळे, मीननाथ पानसरे, बाळू भालिंगे, गणेश कबाडी, वसंत कबाडी आदी ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com