esakal | अबब! दुचाकीच्या सीटखाली निघाला नाग अन् सर्पमित्रालाच केला दंश
sakal

बोलून बातमी शोधा

snake

दुचाकीच्या सीटखाली नाग निघाल्याने फिटर व गाडी मालकाची भंबेरी उडाली. सर्पमित्र प्रवीण रणदिवे यांना नागाला पकडताना दंश झाला आहे. रणदिवे हे केडगाव ( ता.दौंड ) उपचार घेत आहेत. 

अबब! दुचाकीच्या सीटखाली निघाला नाग अन् सर्पमित्रालाच केला दंश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केडगाव( पुणे) : दुचाकीच्या सीटखाली नाग निघाल्याने फिटर व गाडी मालकाची भंबेरी उडाली. सर्पमित्र प्रवीण रणदिवे यांना नागाला पकडताना दंश झाला आहे. रणदिवे हे केडगाव ( ता.दौंड ) उपचार घेत आहेत. 

दुचाकी मालक चंद्रकांत रणदिवे ( रा. रांजणगाव सांडस ता.शिरूर ) हे पारगाव येथे दुचाकीवरून येत होते. गाडी चालताना झटके मारत होती म्हणून त्यांनी पारगाव येथील दुचाकी फिटर अनिल ताकवणे यांच्याकडे गाडी आणून लावली. ताकवणे यांनी गाडीचे सीट उघडले असता त्यातून नागाने फणा काढला. गॅरेजपासून जवळच असलेले सर्पमित्र प्रवीण रणदिवे तेथे आले त्यांनी नागाला पकडण्याचा प्रयत्न केला. नाग पकडताना नागाने प्रवीण यांच्या हाताला दंश केला. प्रवीण यांनी नागाला हातात पकडून मित्राच्या साह्याने दुचाकीवरून केडगावचे थोरात हॉस्पिटल गाठले. प्रवीणचा नागासह हॉस्पिटलमध्ये प्रवेश झाल्याने रूग्ण घाबरून बाजूला पळाले. तेथे प्रवीण यांनी सापाला पिशवीत घातले.

डॉ. जयसिंग थोरात यांनी प्रवीण यांच्यावर तातडीने उपचार केल्याने त्यांचे प्राण वाचले आहे. या नागाला बोरमलनाथ परिसरातील वन विभागात सोडून देण्यात आला. सध्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सापांचे प्रमाण वाढले आहेत. नागरिकांनी दक्षता घ्यावी आवाहन डॅा. थोरात यांनी केले आहे. 

loading image
go to top