चालत्या गाडीवरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविले  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

वारजे माळवाडी - चालत्या वाहनावरील व्यक्तीच्या वस्तू पळविण्याचा प्रकार वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोनवेळा घडले आहेत. वडील भावासोबत गाडीवरून जाताना गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पळविले. हा सुमारे लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरल्याची घटना घडली आहे. 

वारजे माळवाडी - चालत्या वाहनावरील व्यक्तीच्या वस्तू पळविण्याचा प्रकार वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोनवेळा घडले आहेत. वडील भावासोबत गाडीवरून जाताना गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पळविले. हा सुमारे लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरल्याची घटना घडली आहे. 

याबाबत पोलिस निरीक्षक बाजीराव मोळे यांनी सांगितले की, काव्या कल्पेश चव्हाण व तिचे वडील आतेभाऊ समाधान चव्हाण याच्या लग्नासाठी कात्रज कोंढवा रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयात सायंकाळी सहा वाजता निघाले होते. सायंकाळी पाउणे सात वाजता पिरंगुटला परतताना तिचे वडील गाडी चालवत होते. काव्या गाडीवर मागे बसली होती. कात्रज येथून मुंबई बैंगलोर हायवे रोडने वारजे मार्ग चांदणी चौककडे जाताना वेदभवन जवळून हायवे सोडून सर्व्हिस रस्त्याने गाडी घेतली होती. उतार असल्याने गाडीचा वेग कमी होता. त्यावेळी, काळ्या पांढऱ्या रंगाच्या स्पोर्ट बाईकवरून दोघे जण आले. त्यांची गाडी काव्यात्या गाडीजवळ आली. मागे बसलेल्या व्यक्तीने चालत्या गाडीवरून काव्याच्या गळ्यातील चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून नेले. त्यानंतर, त्या चोरट्यांची वेगात सर्व्हिस रस्त्याने वेदभवन, चांदनी चौकाच्या दिशेने पळून गेले. त्यांच्या गाडीचा नंबर काही एमएच41 हे आकडे दिसले. त्यावेळी काव्या मोठ्यांने ओरडली. तिच्या वडीलांनी गाडी थांबवली. तेव्हा त्यांनी तिला काय झाले, असे विचारले असता काव्याने त्यांना झाली घटना सांगितली. त्यानंतर  घाबरल्याने ते थेट पिरंगुटला राहत्या घरी गेलो. त्यानंतर त्यांनी परत येऊन वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात प्रकाराबाबत तक्रार दिली.

तसेच वारजे माळवाडीतून मंगळवारी सकाळी प्रियांका उमेशकुमार जगवानी कर्वेनगरला मुलीला क्लासला सोडून रिक्षातून बालेवाडीला निघाल्या होत्या. डुक्कर खिंडीजवल महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघानी पळविली होती. असाच वरील प्रकार मंगळवार संध्याकाळी घडला.

Web Title: snatched mangalsutra in varje malwadi