एका पायाने तो आहे अधू...मात्र तरी देखील...काय म्हणावेे या जिद्दीला...

school.jpg
school.jpg

पुणे : स्वत:च्या दु:खांवर, अडचणींवर मात करून इतरांसाठी झटणारी माणसं पहिली की अशा माणसांना पाहुन अनेकांना प्रेरणा मिळते. असेच एक उदाहरण म्हणजे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असणारे सागर सिद्धप्पा निंबाळकर.

गुलटेकडी परिसरातील वस्तीत राहणारे निंबाळकर यांचा बालवयातच पोलिओ या आजाराने एक पाय कायमचा अधू झालेला आहे. घरची परिस्थिती ही बेताचीच, पण अशा परिस्थितीतही ते या सर्वांवर मात करत खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.

एवढेच नव्हे तर कोरोनाचा संसर्ग वाढत असताना इतरांना ते मदतीचा हात देत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुलटेकडी वस्तीतील सहा हजार नागरिकांची  तपासणी करण्यात आली, त्यात स्वयंसेवक व वस्तीप्रमुख म्हणून निंबाळकर कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः वस्तीतील शेकडो नागरिकांना 'मास्क'चे वाटप केले.

वस्ती व वस्तीतील शौचालये स्वच्छता ,औषध फवारणी यात ही त्यांचा सहभाग आहे. निंबाळकर हे शाळेत विद्यार्थीप्रिय भैयाजी म्हणून ओळखले जातात. शहरात विविध ठिकाणी कोरोनाचा विळखा बसलेला असतानाही ते आपल्यापरीने समाजाप्रती सेवा रुजू करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लहानपणापासूनच 'संत नारायणगुरु अभ्यासिकेचे'  निंबाळकर हे विद्यार्थी आहेत. आता ते अभ्यासिकेचे विद्यार्थी प्रमुख म्हणून काम पहात आहेत. त्याच्या माध्यमातून  वस्तीतील ८० कुटुंबांना आठवडयातून एकदा धान्यकिट व भाजीपाला वाटप करण्यात ही त्यांचा सहभाग आहे. कोरोनाच्या संकटावेळीही  स्वतःचे दु:ख कुरवाळत न बसता ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

माझी आई एक ठिकाणी हॉटेलमध्ये भाकरी बनविण्यासाठी जाते. 'आपल्यातील एक खास दुसऱ्या द्यायचा', असे बालकडू तिच्याकडूनच मिळाले. म्हणून माझ्यापरीने होईल, तशी मदत गरजुंना देत आहे. त्यातून मिळणारे समाधान शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. - सागर निंबाळकर, शिपाई, नूतन मराठी शाळा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com