कल्याणीनगर परिसरात सोशल डिस्टन्सचे तीनतेरा

kalyani nagar1.jpg
kalyani nagar1.jpg

रामवाडी (पुणे) : न्यू कल्याणीनगर येथे  खाद्य दुकानांसमोर नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. व्यवसायिकांना दुकाने सुरु करताना नियम व अटी घालण्यात आल्या होत्या पण त्याचे पालन होत नसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. विना मास्क फिरणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला आहे. कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून सदर ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.

मार्च महिन्यापासून खाद्यपदार्थांची दुकान बंद असल्याने व्यवसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होत होते. यासाठी शासनाकडून व्यवसायिकांना काही नियम व अटी घालून दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खरेदीच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मित्र मैत्रिणीचा  ग्रुप एकत्र येऊन चहा, वडापाव, ज्युस, नूडल्स इतर खाद्य पदार्थावर ताव मारण्यासाठी या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी करत आहेत. खाद्य दुकानासमोर नागरिक खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. खाद्य पदार्थं खरेदी करून  घोळक्याने उभे राहणे गप्पांची मैफिल रंगवत वडापाव चहावर आणि इतर पदार्थावर ताव मारत राहणे, पायरीवर गप्पा मारत बसणे  असे प्रकार या ठिकाणी सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या  वाढत असताना विक्रेते व ग्राहकांकडून नियमांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नियम पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई केली जावी अशी तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.


दररोज या ठिकाणी खवव्ये एकत्रित येऊन दुकानासमोर उभे राहतात. खरं तर पार्सल घेऊन घरी जाणे हे दुकानदार व ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य असुन ही नागरिक  विनाकारण गर्दी करून स्वतः बरोबर इतरांचा जीव धोक्यात घालत आहे.

- अर्पणा शेलार, रहिवाशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com