रामवाडी परिसरात सोशल डिस्टन्सचा फज्जा

social distance.jpg
social distance.jpg

रामवाडी (पुणे) : पुण्यात आज मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन सुरु होणार असल्याने नागरिकांनी अन्नधान्य, भाजीपाला, अंडी, फूड पॅकेट, खरेदीसाठी शेवट दिवसापर्यंत नागरिकांची धावपळ सुरु होती. पुढील पाच दिवस घरात धान्य, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्यासाठी नागरिकांची दुकानांबाहेर   गर्दी वाढली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्याने अनेक किराणा दुकान, मॉल, चिकन, मटण शॉप, बेकरी तसेच फरसाण मिठाई खरेदी करून ठेवण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते.

काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले जात होते. तर काही ठिकाणी गर्दीमुळे फज्जा उडाला होता. धान्य दळून घेण्यासाठी पीठ गिरणी येथे नागरिकांची ये जा सुरु होती. पालेभाज्या, फळभाज्या आणि फळे खरेदी करिता भाजी मंडईत नागरिकांनी धाव घेतली होती. तसेच नॉनव्हेज प्रिय खवय्यांकडून मासे, चिकन, मटन, अंडी खरेदी करताना दिसत होते. बेकरी तसेच स्वीट होमच्या शॉपमध्ये टोस्ट खारी, मफिन्स शेव, फरसाण, पाणीपुरी, स्वीट्स खरेदीसाठी नागरिकांकडून केली जात होती. मार्च महिन्यापासून काही दिवसांचे अंतर राखून लॉकडाउन करण्यात आले असले तरीही लॉकडाउन म्हटले की नागरिक खरेदीसाठी मोठया प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे गर्दी वाढून कोरोना रुग्ण संख्या वाढेल की काय अशी धास्ती निर्माण झाली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या दोन दिवसात खरेदीसाठी लोकांनी खुपच गर्दी केली होती. पुढचे दहा दिवस कडक नियम पाळले पाहिजे तसेच काही दिवस लोकांनी घरात थांबून राहिले तर कोरोना रुग्ण संख्या नक्कीच कमी होऊ शकते.

-सोनाली नहार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com